नवी दिल्ली 07 ऑगस्ट : प्रेमासाठी (Love) सगळी नाती विसरून प्रेमी युगुलं एकत्र आल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र, आता समोर आलेली एक घटना वेगळीच आहे. कारण या घटनेत एकमेकांसाठी मुलगा आणि आईप्रमाणं असणारं नातं प्रेमात बदललं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील आहे. यात 50 वर्षीय सासूचं आपल्याच 25 वर्षीय जावयावर प्रेम जडलं. इतकंच नाही तर दोघांनी प्रेमात असं पाऊल उचललं, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. मुंबई पोलिसांना कामाला लावणाऱ्या तरुणांना अटक; बॉम्बच्या अफवेमागचं सत्य उघड प्रेमात या सासू आणि जावयानं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी नेहमी सोबत राहण्यासाठी पळून जाऊन लग्न केलं. भौराकला ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील महिलेनं नुकतंच आपल्या मुलीचं लग्न (Marriage) केलं. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच तिचं आपल्या जावयावर प्रेम जडलं. यानंतर महिला आपल्या जावयासोबत घर सोडून पळून गेली. अकोल्यात विद्यार्थिनीवर 4 वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाचं विकृत कृत्य उघडकीस घरातून पळून गेल्यानंतर हे जोडपं 10 महिने सोबत राहिलं आणि नंतर लग्न करूनच ते घरी परतले. त्यांच्या लग्नाबाबत जेव्हा स्थानिक लोकांना आणि नातेवाईकांना माहिती झालं, तेव्हा एकच गोंधळ उडाला. सासू आणि जावयाच्या नात्याची चर्चा पूर्ण गावात रंगली. जेव्हा पती आणि आईच्या नात्याबाबत मुलीला माहिती झालं तेव्हा तिनं गोंधळ घातला. मात्र, सासू आणि जावयानं स्पष्ट केलं, की ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना सोबत राहायचं आहे. अखेर त्यांच्या हट्टापुढे नातेवाईकांनीही हार मानली आणि दोघांसोबतच नातं तोडलं आहे. मात्र, एकमेकांसोबत लग्न केल्यानं हे जोडपं आता आनंदी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.