अकोला, 07 ऑगस्ट: अकोल्यात (Akola) एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रशिक्षकानं सलग चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची (Coach Raped Female Student) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं प्रशिक्षकानं सैनिक भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला विविध ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले आहेत. आपली फसवणूक होतं असल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं गुरुवारी रात्री उशीरा अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 22 वर्षीय पीडित तरुणी मूळची शेगाव येथील रहिवासी आहे. मागील चार वर्षांपासून ती सैनिक भरती प्रशिक्षणाच्या निमित्तानं अकोल्यात एका भाड्याच्या खोलीत राहते. पीडित तरुणी अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर पोलीस आणि सैनिक भरतीच प्रशिक्षण घेण्यासाठी जात असत. दरम्यान येथील आरोपी प्रशिक्षक अमित जाधव याची तिच्यावर नजर पडली. दोघंही एनसीसीत असल्यानं त्याच्यांत मैत्री वाढत गेली. यानंतर आरोपी अमितने प्रेम करत असल्याची बतावणी करत पीडित तरुणीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत. हेही वाचा- पती अन् त्याच्या मैत्रिणीचा FBवर विकृत उद्योग; छळाला कंटाळून शिक्षिकेनं दिला जीव पीडित तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आरोपी प्रशिक्षकानं मागील चार वर्षांच्या काळात पीडितेला विविध ठिकाणी नेत तिचं लैंगिक शोषण केलं आहे. पण आपली फसवणूक होतं असल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध गुन्ह्यांतर्गत आरोपी प्रशिक्षक अमित जाधव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- ज्याच्यावर प्रेम केलं त्याचीच हत्या; पतीच्या मित्रासोबत जुळलं प्रेम आणि… गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपी प्रशिक्षकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपी प्रशिक्षकाची चौकशी करत असून दोघांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







