हैदराबाद, 17 जानेवारी : जावई घरी येणार म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतातच. मग लाडक्या मुलीच्या आवडीनिवडी राहिल्या बाजूला त्यापेक्षा जावयाच्या आवडीनिवडी विचारात घेतल्या जातात. जावयाला काय हवं, काय नको, त्याला कसली कमी पडायला नको, त्याला जे जे काही हवं ते मिळावं, यासाठी सासू-सासऱ्यांची धडपड सुरू असते. जावई घरी आला की त्याच्या आवडीचेच पदार्थ घरी बनतात आणि अगदी ताटभरून जावयाला जेवायला दिलं जातं. अशाच एका कुटुंबाने आपल्या जावयाच्या केलेल्या पाहुणाचाराची चर्चा होते आहे.
आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम गावात राहणारे टाटावर्ती बद्री. हैदराबादमध्ये राहणारे त्यांचे जावई पृथ्वीगुप्त चावला आणि मुलगी हरिकाला त्यांनी संक्रांतीच्या सणाला बोलावलं. त्यांचा असा जंगी पाहुणचार करण्यात आला की पाहून तुम्हीही भारावून जाल. आपला जावई घरी येणार याचा इतका आनंद झाला की या कुटुंबाने त्याचं अगदी जंगी स्वागत केलं.
हे वाचा - याला म्हणतात नशीब! बायकोच्या पर्समधील फक्त 160 रुपयांच्या वस्तूने नवरा बनला करोडपती
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सासूने आपल्या हातांनी घरीच जावयासाठी पक्वानं बनवली. फक्त पाच नव्हे तर तब्बल 173 पक्वानं... काय फक्त आकडा ऐकूनच तुम्हाला भोवळ आली ना?
बद्री यांनी सांगितलं की, माझी मुलगी आणि जावयासोबत आम्ही कधी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता. यावर्षी आम्ही तो एकत्र साजरा केला. माझ्या बायकोने 173 प्रकारची पक्वानं बनवली होती. यासाठी गेल्या चार दिवसांपासून ती काम करत होती.
पदार्थही असे तसे नाहीत. फक्त नावं वाचूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. सासू संध्या म्हणाली, जावयासाठी तयार करण्यात आलेल्या पदार्थांत भजी, पुरी, कारलं, हलवा, पापड, लोणचं, मिठाई, थंड पेय, सोडा इत्यादी पदार्थांचा समावेश होता. आपल्या नवऱ्याचं आपल्या माहेरी असं हटके स्वागत पाहून मुलीलाही आनंद आवरेना.
तुमचं लग्न झालं असेल तर अशी माझी सासूही अशीच असती तर असा विचार करत असाल आणि लग्न झालं नसेल तर मग मला अशीच सासू हवी असंच तुम्हालाही वाटत असेल, नाही का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hyderabad, Viral, Viral videos