आजवर तुम्ही घराबाहेर दरवाजाला किंवा भिंतीवर नेमप्लेट म्हणजे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव पाहिलं असेल. नेमप्लेटवर काही लोक घरातील पुरुषांसह महिलांचीही नावं लिहितात. पतीसह पत्नीचंही नाव असतं.
पण एक असं ठिकाण जिथं तुम्हाला घराबाहेर महिलांचे फोटो दिसतील. त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीचे हे फोटो असतात. इथं घराबाहेर पत्नीनचे फोटो लावणं बंधनकारक आहे.
आजही राजेशाही असलेल्या मुस्लिम देश ब्रुनेईतील ही अजब परंपरा आहे. अगदी इथल्या राजानेही राजवाड्याबाहेर आपल्या पत्नींचे फोटो लावले आहेत. या राजाच्या 6 पत्नी आहेत.
ब्रिटिश राजवटीत राहिलेला हा देश 1 जानेवारी 1984 साली स्वतंत्र झाला. तेव्हापासून इथं राजेशाही आहे. पण इथल्या महिला अनेक अधिकारांपासून वंचित आहेत.
पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करता येतात. जे पुरुष एकापेक्षा अधिक विवाह करतात त्यांना घराबाहेर भिंतीवर पत्नींचे फोटो लावावे लागतात. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)