जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : महिलेचा अजब छंद; इतरांच्या मुलांना देते जन्म, नवऱ्यालाही नाही आक्षेप

Viral News : महिलेचा अजब छंद; इतरांच्या मुलांना देते जन्म, नवऱ्यालाही नाही आक्षेप

महिलेचा अजब छंद; इतरांच्या मुलांना देते जन्म

महिलेचा अजब छंद; इतरांच्या मुलांना देते जन्म

जगभरातील प्रत्येक लोकांच्या अनेक वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. खास करुन महिलांचे अनेक हटके छंद, आवडी असतात. अनेकांनी कधी विचारही केला नसेल अशा आवडी लोकांच्या असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जुलै : जगभरातील प्रत्येक लोकांच्या अनेक वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. खास करुन महिलांचे अनेक हटके छंद, आवडी असतात. अनेकांनी कधी विचारही केला नसेल अशा आवडी लोकांच्या असतात. आवडी, छंदाविषयी अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एक महिलेला मुलांना जन्म देण्याची आवड आहे. यासाठी ती दुसऱ्याच्या मुलांना जन्म देते. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. 26 वर्षीय महिलेला गरोदर राहण्याची आवड आहे. तिला मुलांना जन्म देणे इतके आवडते की स्वतः 3 मुले झाल्यानंतर ती आता इतर मुलांनाही जन्म देत आहे. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल मात्र ही गोष्ट खरी असून या महिलेचं नाव येसेनिया लाटौर आहे.

News18लोकमत
News18लोकमत

येसोनिया 26 वर्षांची आहे. ती 5 वर्ष आणि 3 वर्षांच्या दोन मुलांची आई आहे. तिचा गर्भपातही झाला आहे पण तिला गर्भधारणेची अजिबात भीती वाटत नाही. तिला मुलांना जन्म द्यायला इतकं आवडतं की स्वतःचं कुटुंब पूर्ण करून आता इतरांच्या मुलांनाही जन्म देते. विशेष म्हणजे पत्नीच्या या छंदावर तिच्या पतीलाही आक्षेप नाही. या आवडीमुळे येसोनियानं सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतला. डेली स्टारनं याबाबत वृत्त दिलं आहे. शिव मंदिरात सिंहांची दहशत; अडकलेल्या पुजाऱ्याने असा वाचवला जीव, पाहा Video येसोनियानं सरोगेट मदर बनवण्याविषयी सांगितलं की, 10 पैकी एका कुटुंबाला सरोगेट्सची गरज असते पण ती सापडत नाही. अशा परिस्थितीत ते ज्या कुटुंबांसाठी मुलांना जन्म देतात त्यांच्याशी संबंध ठेवतात. मूल झाल्यावर लोक त्यांना विविध भेटवस्तू देतात आणि त्यांना आनंदी ठेवतात. त्यानंतर त्या कुटुंबाशी कायमचे जोडले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात