बंगळुरू, 19 जानेवारी : ट्रॅफिकचं रडगाणं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही दररोज त्याचा सामना करत असाल. ट्रॅफिकमुळे किती तरी लोक हैराण झाले आहेत. बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी आपल्याला वेळेतच पोहोचायचं असतं आणि नेमकं त्याच दिवशी वाहतूक कोंडीत अडकल्यावर आपली चिडचिड होते. असंच एका नवरीसोबत घडलं. लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता. तरी नवरी ट्रॅफिकमध्येच अडकली होती. शेवटी वेळेत लग्न मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी नवरीने अशी शक्कल लढवली की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या नवरीबाईने लग्नाचा मुहूर्त चुकू नये, वाहतूक कोंडीतून आपली सुटका व्हावी म्हणून जे केलं, ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. स्मार्ट नवरीबाईने अशी भन्नाट आयडिया वापरली की ट्रॅफिकमध्ये अडकूनही ती लग्नाच्या मुहूर्ताआधी लग्नमंडपात पोहोचली. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडलं. हे वाचा - अजब लग्नांची गजब कहाणी! कुणी निर्जीव वस्तू तर कुणी खतरनाक प्राण्यांसोबतच थाटला संसार व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वेडिंग ड्रेस, दागिने घालून नटलेली नवरीबाई गाडीतून बाहेर पडते आणि थेट मेट्रो स्टेशनवर पोहोचते. तिथं ती मेट्रोमध्ये जाते. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मेट्रोचा प्रवास याची चिडचिड तिच्या चेहऱ्यावर बिलकुल नाही. उलट हसत हसत ती मेट्रो प्रवास करताना दिसते आहे. नवरीबाईला मेट्रोमध्ये पाहून मेट्रोतील इतर प्रवासी हैराण होतात. पण नवरीला काही फरक पडत नाही. तिला फक्त मुहूर्ताआधी मंडपापर्यंत पोहोचण्याची घाई असते. त्यानंतर ती दिसते ती थेट वेडिंग हॉलमध्ये स्टेजवर दिसते. तिने वेळेत लढवलेली शक्कल तिला चांगलीच कामी आली. हे वाचा - भरमंडपात दे दणादण! नवरा-नवरीनेच एकमेकांना धू-धू धुतलं; असं झालं तरी काय Watch Video @ForeverBLRU ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बंगळुरूतील आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि ट्रॅफिकशी संबंधित तुमच्या माहितीत असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.