लंडन, 30 मार्च : लहान मुलं कुणाला आवडत नाही. मुलांमुळे घर अगदी भरलेलं, आनंदी वाटतं. त्यामुळे घरात चिमुकला नवा पाहुणा येणार म्हटलं की घरात उत्साह असतो. पण सध्या असं एक कपल चर्चेत आलं आहे, ज्यांना मुलांची इतकी हौस आहे की एका वर्षातच ते तीन मुलांचे आईबाबा झाले. ते कमी की काय आता चौथ्या बाळाच्या आगमनाची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
रॅचेल स्वानी आणि जस्टिन हे कपल मुलांची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर काही दिवसांतच मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना लगेच मूल हवं होतं. त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांना असा आशीर्वाद दिला की त्यांच्यावर भरभरून कृपा झाली.
हे वाचा - 'सिगारेट-दारू सोडा नाहीतर घराबाहेर पडा', बायकोने धमकी देताच नवऱ्याने घेतला शॉकिंग निर्णय
एकाच वर्षात तिने एकामागोमाग एक तीन मुलांना जन्म दिला. रॅचेलची मुलगी एम्मा एक वर्षाची झाली तेव्हा रॅचेलने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांनी तिचं घर भरलं.
या मुलांना सांभाळणं म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरतच. मुलांसोबत दिवस कसा जातो हे तिला समजतही नाही. या मुलांची ती कशी देखभाल करते, काय आव्हानांना तिला सामोरं जावं लागतं, याबाबत तिने आपल्या युट्यूब चॅनेलवरही याचा अनुभव मांडला आहे.
हे वाचा - शाळेत मुलांचा Confidence कमी पडण्यात पालकांच्या या चुका ठरतात कारण, वेळीच बदला
तिची रात्रीची झोप तर पूर्णपणे उडालीच आहे. त्यामुळे मुलांना सांभाळण्यावरून या कपलमध्येही वाद होतात. ठरवूनही जस्टिन काही तिची मदत करणं शक्य होत नाही. तरी हे कपल आता चौथ्या बाळाचे आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.