• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सिंहाच्या कळपात एकटी भिडली आई; सिंहिणीच्या जबड्यातूनही म्हशीने वासराला खेचून आणलं

सिंहाच्या कळपात एकटी भिडली आई; सिंहिणीच्या जबड्यातूनही म्हशीने वासराला खेचून आणलं

वासराला पळवून नेणाऱ्या सिंहांवर एकटी म्हैस भारी पडली.

 • Share this:
  मुंबई, 11 जून : आईच्या (Mother) प्रेमाला कशाचीच तोड नाही. प्रेमळ, कोमल स्वभावाची असलेली आई आपल्या लेकराच्या जीवावर जेव्हा बेततं तेव्हा प्रसंगी किती आक्रमक होऊ शकते, हे वारंवार दिसून आलं आहे. मग ती माणूस असो किंवा प्राणी (Animal video). त्यांच्यातील आईचं काळीज (Animal mother video) हे सारखंच असतं. आपल्या बाळांसाठी, पिल्लांसाठी आई मृत्यूच्याही दारात जाऊ शकते, मृत्यूच्या दारातूनही आपल्या लेकरांना, पिल्लांना परत आणू शकते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. एका म्हशीने (Buffalo) आपल्या वासराला वाचवण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घातला आणि अखेर तिने आपल्या वासराला कसं वाचवलं, तेच सांगणारा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक म्हैस आणि वासरू धावतं आहे. त्यांच्या मागे सिंहाचा (Lion video) कळप लागला आहे. एक सिंह आणि बाकी सिंहिणी दिसत आहेत. म्हैस आणि वासराच्या मागे पळणाऱ्या सिंहांपैकी एका सिंहाने वासराला आपल्या जबड्यात पकडलं आणि तिथून धूम ठोकली. शेजारील झाडांमध्ये हा सिंह घुसला. बाकी सिंह तिथंच बाहेर होते. पण सुरुवातीला आपल्या वासरासह सिंहांपासून दूर पळणारी आई म्हणजेच म्हैस आता मात्र मुद्दामहून त्या कळपात गेली. तिला आता अजिबात त्या सिंहांची भीती वाटत नव्हती. कारण तिच्यासाठी तिच्या वासराचा जीव महत्त्वाचा होता. हे वाचा - OMG! तरुणाने 180 डिग्रीमध्ये फिरवली स्वतःची मान आणि...; VIDEO पाहून बसेल शॉक ज्या सिंहाने तिच्या वासराला पळवलं. त्याच्या मागे ती धावत त्या जंगलात घुसली. तिने त्याला शोधून काढला आणि त्या सिंहाच्या जबड्यातून आपल्या वासराला सुखरूप बाहेर आणलं. जेव्हा सिंहाने त्या वासराला पळवलं आणि त्याची आई त्याचा जीव वाचवायला त्याच्यामागोमाग गेली तेव्हा खरंतर आपल्यालाही ते वासरू काही आता भेटणार नाही, असंच वाटलं. पण नाही आईने तिच्या वासराला मृत्यूच्या दारातूनही परत आणलं. तिचं हे धैर्य पाहून बाकी सिंहसुद्धा गार पडले. जेव्हा ती आपल्या वासराला घेऊन पुन्हा आली तेव्हा फक्त सिंहिणीच नव्हे तर सिंहसुद्धा या आईला घाबरताना दिसला, त्याने तर चक्क तिथून धूमच ठोकली. हे वाचा - शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; खेळण्यातील गाडीप्रमाणे उडवल्या कार आयएफस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आईचं धैर्य असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: