मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! तरुणाने 180 डिग्रीमध्ये फिरवली स्वतःची मान आणि...; VIDEO पाहून बसेल शॉक

OMG! तरुणाने 180 डिग्रीमध्ये फिरवली स्वतःची मान आणि...; VIDEO पाहून बसेल शॉक

एखाद्या हॉरर फिल्ममधील सीन वाटावा, तसाच हा व्हिडीओ आहे.

एखाद्या हॉरर फिल्ममधील सीन वाटावा, तसाच हा व्हिडीओ आहे.

एखाद्या हॉरर फिल्ममधील सीन वाटावा, तसाच हा व्हिडीओ आहे.

मुंबई, 10 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकानं हॉरर फिल्म (Horror film) किंवा हॉरर सीरिअल पाहिली आहे. यामध्ये आपण भूताची मान (Neck) 180 किंवा 360 डिग्रीमध्ये गोलगोल फिरल्याचंही पाहिलं आहे. असं फक्त फिल्ममध्येच होऊ शकतं, प्रत्यक्षात नाही. कारण आपल्या प्रत्येकाची मान डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली या चार दिशेला सहजपणे हलते. मात्र 180 किंवा 360 डिग्रीमध्ये फिरवणं शक्यच नाही. मात्र हे अशक्यही शक्य करून दाखवलं ते एका तरुणानं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

काही लोकांकडे अशा कला असतात ज्या आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्या तरी त्यावर विश्वास बसत नाही. काहींचं शरीर इतकं लवचिक असतं की त्यात हाडं आहेत की नाही असाच प्रश्न पडतो. अगदी रबरासारखे ते कशीही हालचाल करू शकतात. अशाच एका तरुणाचा हा व्हिडीओ. तरुणाने आपलं टिकटॉक हँडल @sheaabutt00 वर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

" isDesktop="true" id="562284" >

व्हिडीओ पाहू शकता एक तरुण उभा आहे. आपल्या दोन्ही हाताने तो आपलं तोंड धरतो आणि डाव्या बाजूला वळवतो. अगदी पुढे असलेला चेहरा तो पाठीमागे नेतो. त्यानंतर हा सोडतो तर त्याचं डोकं पुन्हा ज्या स्थितीत होतं त्या स्थितीत येतं. जणू काही त्याच्या मानेला स्प्रिंगच लावलेलीआहे.

हे वाचा - Weird Food : तरुणीनं आनंदानं खाल्ली आईस्क्रीम, नंतर अशी झाली ओठांची अवस्था

याआधीसुद्धा अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. @GaurangBhardwa1 ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये तरुण आधी आपली मान आपल्या डाव्या दिशेला वळवतो त्यानंतर दोन्ही हातात आपलं डोकं धरून तो फिरवतो. समोरील तोंड उचलून तो सहजपणे जणू पाठीवरच ठेवतो. त्याचं तोंड पाठीकडे वळतं. एखादी बनावट डोकं उचलून ठेवावं तसंच या तरुणानं आपलं खरं डोकं फिरवून ठेवलं. आपण डोळ्यांनी पाहूनही यावर विश्वास ठेवू शकत नाही.

हे वाचा - OMG! सोशल मीडियावर VIDEO पाहून लावला फेस मास्क; तिच्या चेहऱ्याचं काय झालं पाहा

हा स्टंट पाहायला जितका खतरनाक आहे, तितकाच करणंही धोकादायक आहे. त्यामुळे तुम्ही मात्र असा प्रयोग घरी करू नका, कारण यामुळे हानी पोहोचू शकते.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos