मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; खेळण्यातील गाडीप्रमाणे उडवल्या कार

शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; खेळण्यातील गाडीप्रमाणे उडवल्या कार

या व्हिडीओमध्ये इतर घटनाही एकत्रित केल्या गेल्या आहेत. या व्हिडीओमध्ये दुसऱ्या एका घटनेत हत्तीने एका गायीवरही हल्ला केल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या घटनेत हत्ती एका टेबलावर बसलेल्या व्यक्तीवरच सोडेंने हल्ला करतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जून : हत्ती जितका समजदार प्राणी मानला जातो, त्याचा रागही तितकाच जास्त असतो. राग आल्यानंतर तो कोणालाच सोडत नाही, मग तो कोणी व्यक्ती, गाडी, सामान काहीही असूदे. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका चिडलेल्या हत्तीने (Angry Elephant) रस्त्यालगत उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला केला.

हा चिडलेला हत्ती आधी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करतो आणि त्यानंतर गाडीची उलथापालथ करतो. चिडलेला हत्ती पाहून लोक इथे-तिथे पळू लागतात. त्यावेळी हत्तीची नजर तिथेच उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या कारवर जाते, आणि हत्ती त्या कारवर तुटून पडतो. तो आपल्या सोडेंने कारची आदळाआपट करतो. तो परत परत सोडेंने कार उचलून जमिनीवर आपटतो. कारला आपल्या सोडेंने धक्के देतो. त्यानंतर इतर दोन हत्तीही तिथे पोहोचतात.

या व्हिडीओमध्ये इतर घटनाही एकत्रित केल्या गेल्या आहेत. या व्हिडीओमध्ये दुसऱ्या एका घटनेत हत्तीने एका गायीवरही हल्ला केल्याचं दिसतंय. तर आणखी एका घटनेत हत्ती एका टेबलावर बसलेल्या व्यक्तीवरच सोडेंने हल्ला करतो.

एका जंगलातून बाहेर आलेला हत्ती एका गाडीवर हल्ला करतो. तो एवढ्यावरच थांबत नाही, तर गाडीवर चढून पायांनी गाडीची आणखी आदळआपट करण्याचा प्रयत्न करतो. पुढे आणखी एका घटनेत हत्ती थेट मगरीशीच भिडल्याचं दिसतंय. नदीकिनारी पाणी पिण्यासाठी आलेल्या हत्तीवर मगर हल्ला करते, हत्तीची सोंडच मगर आपल्या जबड्यात पकडते. पण हत्ती त्यातून स्वत:ची सुटका. तो एवढ्यावरच थांबत नाही, तर पुढे आणखी पाण्यात जाऊन मगरीशी भिडतोही.

(वाचा - शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं)

एका जंगलातून जाणाऱ्या टुरिस्ट जीपवर हत्ती आपल्या सोडेंने हल्ला करतो. हा हल्ला इतक्या वेगात होतो, की जीप रस्त्यावरुन खाली उतरते. जीपमध्ये बसलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागतात. काही वेळाने हत्ती तिथून निघून जातो.

" isDesktop="true" id="562429" >

(वाचा - जिराफाची शिकार करणं सिंहाला पडलं भारी, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं)

हा व्हिडीओ अ‍ॅनिमल चॅनेल नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 32 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Elephant, Video viral