मराठी बातम्या /बातम्या /Viral /Circus चा खेळ पडला उलटा! 2 सिंहांनी ट्रेनरचेच पाय धरले आणि...; खतरनाक VIDEO

Circus चा खेळ पडला उलटा! 2 सिंहांनी ट्रेनरचेच पाय धरले आणि...; खतरनाक VIDEO

सर्कसमधील खतरनाक व्हिडीओ (Circus shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.

सर्कसमधील खतरनाक व्हिडीओ (Circus shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.

सर्कसमधील खतरनाक व्हिडीओ (Circus shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.

मॉस्को, 25 मे : सर्कस (Circus) पाहायला अनेकांना आवडतं. आश्चर्यचकीत करणारे जादूगाराचे खेळ आणि खळखळून हसवणारे विदुषकाचे खेळ याशिवाय चित्तथरारक कसरती आणि प्राण्यांचे खेळ पाहून धडकीच भरते. सिंह, हत्ती, वाघ अशा जंगली प्राण्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्कसमध्ये आणलं जातं. जरी त्यांना प्रशिक्षण दिलेलं असलं तरी शेवटी ते जंगली प्राणीच. कधी काय करतील याचा नेम नाही (Animal attack on trainer in cirus). त्यामुळे प्रेक्षकांसह अगदी या प्राण्यांचे ट्रेनरही जीव मुठीत धरूनच असतात. सध्या सर्कसमधील असाच एक खतरनाक व्हिडीओ (Circus shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. जिथं दोन सिंहांनी ट्रेनरवर (Lion attacked on trainer in circus) हल्ला केला आहे.

आपल्या तालावर नाचवणाऱ्या ट्रेनरवरच सिंहांनी अटॅक केला आहे. हा व्हिडीओ अगदी धडकी भरवणारा आहे. व्हिडीओ पाहताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता दोन सिंह सुरुवातीला आपसात खेळताना दिसत आहेत. काही वेळातच एक सिंह रिंगमध्ये असेलल्या ट्रेनरच्या दिशेने धावून जातो. त्याला जमिनीवर पाडतो आणि त्याचा एक पायही आपल्या तोंडात धरतो. ट्रेनरचा पाय आपल्या तोंडात धरून त्याला घसटण्याचाही प्रयत्न करतो. त्यानंतर आजूबाजूचे इतर ट्रेनर तिथं धावून येतात, शिवाय ज्या ट्रेनरवर हल्ला झाला आहे, तोसुद्धा आपल्या हातातील काठीने सिंहाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा - 'मैं आपको उडा डालूंगा', नागपूरच्या 'त्या' चिमुकल्याचा केस कापताना नवा VIDEO

डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ रशियातील असल्याचं सांगितलं जातं आहे. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रेक्षक सर्कसचा तंबू सोडून बाहेर पडले.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal