इस्लामाबाद, 26 मे : दरोडा म्हटलं की तोंडावर मास्क घालून किंवा तोंडाला कपडा गुंडाळून, तोंड झाकून आणि हातात बंदू, चाकू असं एखादं शस्त्र घेऊन काही व्यक्ती बँक किंवा दुकानात घुसतात. आपल्या हाताताली शस्त्राचा धाक दाखवत बँक किंवा दुकानातून सर्व पैसे किंवा महागड्या वस्तू घेऊन फरार होतात. अगदी असाच सीन आपल्या डोळ्यासमोर येतो. प्रत्यक्षात नाही पण फिल्ममध्ये तर तुम्ही असे दरोडे पाहिले असतील किंवा बातम्यांमध्ये प्रत्यक्षातील दरोड्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर दरोड्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल.पाकिस्तानच्या एका दुकानातील दरोड्याचा हा व्हिडीओ आहे. ज्यात दुकानदार आणि व्हिडीओत आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे.
पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलवर दाखवण्यात आलेला हा सीसीटीव्ही व्हिडीओ मनोज नावाच्या व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे वाचा - Circus चा खेळ पडला उलटा! 2 सिंहांनी ट्रेनरचेच पाय धरले आणि…; खतरनाक VIDEO दोन दरोडेखोर दुकानात घुसले आहेत. सुरुवातीला ते दुकानातील काही सामान चोरतात. त्यानंतर एक दरोडेखोर सामान घेऊन आपल्या गाडीत ठेवण्यासाठी दुकानातून बाहेर जातो. आतर दुसरा दरो़डेखोर दुकानाच्या गल्ल्याजवळ पोहोचतो. गल्ल्याजवळ दुकानदारही बसलेला दिसतो आहे. त्याने आपल्या पैशांचा ़ड्रॉवर खोलला आहे आणि त्याच्या आका हातात पिशवीही दिसते आहे. दरोडेखोर आपल्या जवळ येण्याआधीपासूनच दुकानदार आपल्या गल्ल्यातील पैसे पिशवीत भरताना दिसतो आहे. दरोडेखोर दुकानदाराजवळ येऊन जास्त रकमेचे पैसे पिशवीत टाकायला सांगतो. तेव्हा दुकानदार काम ठिक चालत नाही तर जास्त रकमेचे पैसे कसे येतील, असं म्हणताना दिसतो. आपली कमाई फार होत नाही, असं तो त्याला सांगतो. तेव्हा दरोडेखोरसुद्धा आमच्याकडेसुद्धा नाहीत रे, आम्ही तर ये मजबुरीमुळे करत असल्याचं म्हणतो. हे वाचा - महिलेने दारू पिऊन क्लबच्या बाहेर केलं धक्कादायक कृत्य; Video पाहून संताप येईल! त्यानंतर दुकानदार दरोडेखोराला आता पुन्हा येऊ नका, अशी विनंतीही करतो. दरोडेखोरसुद्धा चक्क त्याच्या विनंतीचा मान राखत, पुन्हा नाही येणार असं आश्वासनही देतो.