मुंबई 2 सप्टेंबर : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं भंडार आहे. याला तुम्ही फक्त स्क्रोल केलात, तरी तुम्हाला इतके व्हिडीओ मिळतील की, ते पाहण्यात तुम्हील तासन तास कसा घालवाल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल. खरंतर या व्हिडीओमधील व्यक्ती जे वागते, ते लॉजिकली एकदम बरोबर आहे. याच कारणामुळे अनेक तरुणांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. आपण आपल्या आजूबाजूला अनेक कपल पाहिले असतील. त्यांच्यामध्ये भांडण, रुसवे, फुगवे, प्रेम हे सगळं होतच असतं. अनेक जोडप्यांचं तर ब्रेकअप होताना देखील तुम्ही पाहिलं असेल. यामध्ये कधी तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला सोडून जाते, तर कधी तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करतो. तसं सध्याच्या पिढीला ब्रेकअप पॅचअप हे नेहमीचं झालं असलं तरी देखील असे अनेक तरुण-तरुणी आहेत. ज्यांना त्यांचा जोडीदार सोडून जातो किंवा त्याचं तुमच्यावर प्रेम नाही असं सांगतो, तेव्हा या एकतरफी प्रेमाचा त्यांना फार दु:ख होतं. ज्यामुळे ते नैराश्यात जातात. हे वाचा : Devar bhabhi Dance : दीराच्या लग्नात वहिनीनं धरला असा ताल, पाहून सगळेच झाले थक्क परंतू एका तरुणाने ब्रेकअपनंतर जे काही केलं, ते पाहून तुम्ही म्हणाल की, त्यानं जे केलं ते एकदम बरोबरंच होतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप हसू देखील येईल. खरंतर एक तरुण आपल्या प्रेससीला खाण्यासाठी बाहेर घेऊन जातो आणि तिला बाहेर सर्वांसमोर रिंग देऊन लग्नासाठी प्रपोज करतो. पण तरुणी लग्नासाठी काही तयार नसते. ती या तरुणाचं लग्नाचं प्रपोजल नाकारते आणि अंगठी घेण्यासाठी देखील नकार देते. हे सगळं घडल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तरुण उठतो आणि या तरुणीच्या पायातील शुज काढतो. एवढंच नाही तर तरुणीच्या पुढ्यात असलेलं जेवण देखील हा तरुण एका पिशवीत टाकतो आणि समोरील एक बॉटल घेऊन तेथून निघून जातो.
खरंतर या तरुणाने ते शुज त्याच्या गर्लफ्रेंडला दिले असावे. परंतू जेव्हा ती या रिलेशनसाठी तयार नाही, तर तिला या तरुणाने दिलेल्या गिफ्ट किंवा शुजची गरज नाही. तसेच तिला जेवायला या तरुणानंच आणलं होतं, त्यामुळे ती जेवत असलेल्या पदार्थाचं बिल देखील या तरुणानंच दिलं होतं. ज्यामुळे तो ते देखील घेतो आणि या तरुणीला एकटं सोडून निघून जातो. हे वाचा : किंग कोब्रासोबत तरुण खेळू लागला, पण शेवटी जे घडलं ते पाहून तुम्ही हादरून जाल, पाहा Viral Video हा व्हिडीओ WTF moments या ट्वीटर अकाउंट वरुन शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे. लोकांनी यावर भरभरुन कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी याला आपल्या मित्रांसोबत शेअर केलं आहे.