मुंबई, 23 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी शिक्षिकेला लाडीगोडी लावणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच्या अगदी उलट शिक्षिकेला धमकी देणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. छोट्याशा चिमुकल्याने शाळेत शिक्षिकेलाच धमकी दिली आहे. अशीतशी धमकी नाही. ही धमकी ऐकूतर तर तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लहान मूल म्हटलं की त्याची धमकी फार फार तर काय… तुझं नाव आईला किंवा बाबांना सांगेन, तुला खाऊ देणार नाही, मी तुझ्याशी कट्टी, तुझ्याशी कधीच बोलणार नाही, तुझ्यासोबत खेळणार नाही… या अशा धमक्या लहान मुलांच्या तोंडून ऐकायला मिळतात. पण या चिमुकल्याने जी धमकी दिली आहे, तीसुद्धा शिक्षिकेला ती ऐकून तुम्हाला तुमच्या कानावरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा शाळेत आहे. तो रडताना दिसतो आहे. त्याच्यासमोर त्याची शिक्षिका आहे, जी या व्हिडीओत दिसत नाही पण तिचा आवाज ऐकू येतो आहे. हे वाचा - ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल शिक्षिका या मुलाला ओरडली म्हणून तो तिच्यावर रागावला आहे. त्याने त्याचा राग फक्त रडून नाही तर बोलूनही व्यक्त केला आहे. आपल्या मनातील शिक्षिकेबाबत असलेली सर्व भडास त्याने शब्दातून बाहेर काढली. शिक्षिकेला तो बोलतो की माझे बाबा पोलिसात आहेत. यावर शिक्षिकाही त्याला विचारते तुझे बाबा पोलिसात आहेत तर मी काय करू. यावर मुलगा म्हणतो गोळी मारेल गोळी. मग शिक्षिका विचारतो कुणाला गोळी मारेल. मुलगा म्हणतो पेटीवर ठेवली आहे. शिक्षिका विचारते मग तू मला मारणार, मुलगा हो बोलतो.
व्हिडीओच्या शेवटी शिक्षिका त्याला तू अभ्यास का करत नाही, असा प्रश्न विचारते. तेव्हा मात्र मुलगा रडत रडत शांत होतो. हे वाचा - आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडलेल्या शाळकरी मुलाबद्दल माहितीयत ‘या’ गोष्टी? @Gulzar_sahab अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या चिमुकल्याची अशी धमकी पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. मुलाचा निरागसपणा आहे पण त्याच्या घरच्यांनाही काळजी घ्यायला हवी. चुकून तो बंदूक घेईल आणि नको तेच घडून बसायला नको, अशी चिंताही नेटिझन्सही व्यक्त केली आहे.