जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आधी मान कापली, मग हृदय काढलं आणि मग गुप्तांग... सायको आशिकचा विचित्र प्रकार

आधी मान कापली, मग हृदय काढलं आणि मग गुप्तांग... सायको आशिकचा विचित्र प्रकार

प्रतिकात्मक फोटा

प्रतिकात्मक फोटा

आरोपीने इतका क्रुर प्रकार केला कारण मृतक त्याच्या मैत्रिणीला त्रास देत होता, जी त्याच्यासोबत पूर्वीपासून संबंधात होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी : प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग ते जग काय बोलेल, लोक काय म्हणतील असा कसलाच विचार करत नाहीत. तसेच लोक प्रेमात अनेकदा कोणाचाही जीव घेण्याचीही हिंमत दाखवतात. मग तो जीव जोडीदाराचा असोत, मित्राचा किंवा मग घरच्यांचा. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, ज्यामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा जीव घेतला आणि कारण आहे प्रेम…. खरंतर एका लव ट्रँगलमुळे एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्याच मित्राचं डोकं त्याच्या धडापासून वेगळं करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो हैवान होत, त्याने आपल्या मित्राचंच हृदय शरीरातून बाहेर काढलं आणि त्याचा प्रायवेट पार्ट देखील कापला. महिलेसमोर आला धावता चाक, बचावासाठी वाकली पण… थरारक अपघात व्हिडीओत कैद आरोपीने इतका क्रुर प्रकार केला कारण मृतक त्याच्या मैत्रिणीला त्रास देत होता, जी त्याच्यासोबत पूर्वीपासून संबंधात होती. हैदराबादच्या बाहेरील पेड्डा अंबरपेट येथे 18 फेब्रुवारी रोजी ही हत्या घडली होती, परंतु एका आठवड्यानंतर आरोपी पी. हरी हर कृष्णाने पोलिसांना आत्मसमर्पण केल्यावर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. 21 वर्षीय तरुणाने अब्दुल्लापूरमेट पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात कृष्णा आणि नवीन कॉलेजच्या काळात दिलसुखनगरमध्ये मित्र होते, असे समोर आले आहे. त्यादरम्यान नवीनचे एका मुलीवर प्रेम होते पण नंतर काही मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. ती मुलगी नंतर कृष्णाच्या जवळ आली आणि काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. नवीनने मुलीला फोन करून एसएमएस पाठवण्यास सुरुवात केली आणि तिने कृष्णाला याबद्दल सांगितले. अखेर संतापलेल्या कृष्णाने नवीनला मारण्याची योजना आखली. आरोपीने 17 फेब्रुवारी रोजी त्याला त्याच्या दिलसुखनगर येथील घरी भेटण्यासाठी बोलावले होते. नंतर कृष्णाने नवीनला नालगोंडा जिल्ह्यातील नरकेतपल्ली येथील कॉलेजच्या वसतिगृहात सोडण्यासाठी सांगितले. वाटेत आरोपीने दारू प्यायली आणि चाकू विकत घेतला. 18 फेब्रुवारीच्या पहाटे वादानंतर कृष्णाने नवीनचा दोरीने गळा आवळून खून केला.

News18लोकमत
News18लोकमत

पुढे त्याने त्याची मान कापली, पोट कापले आणि हृदय बाहेर काढले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी मृताचे गुप्तांग आणि बोटेही कापली आहेत. नवीनच्या नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपासाचा एक भाग म्हणून पोलीस कृष्णाच्या कुटुंबीयांची चौकशी करत होते. मात्र, आरोपीने रचकोंडा पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या अब्दुल्लापूरमेट पोलिस ठाण्यात हजर राहिल्यानंतर हा खून उघडकीस आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात