जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! 14 कोटीला विकला गेला एक उंट; असं काय आहे खास? पाहा VIDEO

OMG! 14 कोटीला विकला गेला एक उंट; असं काय आहे खास? पाहा VIDEO

OMG! 14 कोटीला विकला गेला एक उंट; असं काय आहे खास? पाहा VIDEO

लिलावादरम्यान सुरुवातीला उंटाची किंमत सुमारे 10 कोटी 60 लाख रुपये ठेवण्यात आली होती, त्यानंतर बोली लावल्यानंतर तो 14 कोटी 23 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मे : हौसेला मोल नाही ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एखादी वस्तू खरेदी करण्याची हौस आणि भरपूर पैसा असेल तर लोक एखादी वस्तू विकत घेण्यासाठी कितीही रक्कम मोजायला तयार असतात. बकरी, घोडा किंवा म्हैस अगदी चढ्या दराने विकले गेल्याच्या बातम्या आजवर तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. आज अशी आणखी एक बातमी समोर आली आहे. यात एका उंटासाठी लागलेली बोली जाणून तुम्हीही थक्क व्हाल (World’s Most Expensive Camel). दिवसरात्र घरातच बंद राहाते ही 7 वर्षीय चिमुकली; बाहेर पडताच होते भयंकर अवस्था या उंटाची किंमत ऐकून तुम्ही फक्त थक्क होणार नाही, तर नक्की या उंटात असं काय खास आहे, असा प्रश्न तुमच्या डोक्यात पहिला येईल. सौदी अरेबियामध्ये एक उंट इतका महाग विकला गेला आहे, की आता असं सांगण्यात येतंय की हा जगातील सर्वात मौल्यवान उंट आहे. हा उंट विकत घेण्यासाठी एक व्यक्तीने 7 दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपये मोजले आहेत (Camel Sold for 14 Crores).

जाहिरात

‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबियामध्ये या उंटाच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. लिलावाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये लोकांनी पारंपारिक कपडे परिधान केलेले आहेत. एक व्यक्ती मायक्रोफोनद्वारे उंटांच्या लिलावासाठी बोली लावताना दिसत आहे. लिलावादरम्यान सुरुवातीला उंटाची किंमत सुमारे 10 कोटी 60 लाख रुपये ठेवण्यात आली होती, त्यानंतर बोली लावल्यानंतर तो 14 कोटी 23 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला. व्हिडिओमध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला नाही की इतके पैसे देऊन उंटाची खरेदी करणारा व्यक्ती कोण आहे. केळीच्या आकारात बनवलंय हे अनोखं बेट, इथं राहतात फक्त अब्जाधीश! एकेका घराची किंमत करोडोंमध्ये एवढ्या जास्त किमतीत विकला गेलेला हा उंट जगभरात आढळणाऱ्या उंटांच्या प्रजातींपैकी दुर्मिळ आहे. या उंटाचं सौंदर्य आणि वेगळेपण जगभर सांगितलं जातं. कारण या प्रजातीचे उंट जगात क्वचितच आढळतात. सौदी अरेबियात उंटाचा बाजार भरतो. यातच हा उंट 14 कोटी 23 लाख रुपयांना विकला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात