नवी दिल्ली, 08 मे : जगातील मोठमोठे अब्जाधीश स्वत:साठी एकामागून एक इमारती आणि घरे बांधतात. संपूर्ण जग हे पाहू शकतं. अंबानींच्या अँटिलियाप्रमाणेच जगात अशी अनेक घरे आहेत, जी एखाद्या महालापेक्षा कमी नाहीत. पण नायजेरियात एक बेट आहे जे संपूर्ण महालासारखं दिसतं. याचं कारण या बेटावर राहणाऱ्या सर्व लोकांची घरं आलिशान आहेत. हे सर्व लोक अब्जाधीश आहेत ज्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र बेट (Banana island in Nigeria) तयार केलं आहे. नायजेरियातील लागोसमध्ये (Lagos, Nigeria) हे केळीच्या आकाराचं बेट आहे. पण नाव ऐकल्यावर असा विचार करू नका की, जेवढी स्वस्तात डझनभर केळी मिळतात, तसेच स्वस्त घर या बेटावर मिळेल. पॅरिस, सॅन डिएगो, न्यूयॉर्क, टोकियो किंवा दिल्लीच्या पृथ्वीराज रोड आणि जोरबाग भागांशी स्पर्धा करेल असं एक कृत्रिम बेट (Artificial island in Nigeria) नायजेरियातील अब्जाधीशांनी तयार केलं आहे. जिथे सर्वत्र चमक दिसत आहे. कारण, या बेटावर फक्त अब्जाधीश राहतात.
(Google Map)
एकेका घराची किंमत करोडोंमध्ये आहे केळीच्या आकाराचं बेट (Banana shaped island in Nigeria) म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बेटावरील जमीन आणि घरांची किंमत खूपच जास्त आहेत. मॅन्शन ग्लोबल वेबसाइटच्या 2019 च्या अहवालानुसार, हे बेट 2000 मध्ये पूर्ण झालं. 402 एकरमध्ये पसरलेलं हे बेट वाळूच्या पायावर तयार करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, येथील 1 स्क्वेअर मीटरची किंमत 84 हजार रुपये आहे. मंडिंग्वा रिअल इस्टेटच्या व्यवस्थापकीय संचालक रॉबर्टा नोबू यांच्या मते, येथील स्वतंत्र घरांची किंमत 21 कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यादरम्यान त्यांनी सांगितलं होतं की, ज्या घराला (Cost of house in Banana island) सर्वात महाग यादी मिळाली ते 6 बेडरूमचं वेगळं घर होतं, जे 2600 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलं होतं आणि त्याची किंमत 100 कोटी रुपयांपर्यंत होती.
(फोटो: Twitter/@NigeriaStories)
कशामुळे हे बेट खास बनतं? रॉबर्टाने सांगितलं की, केळ्याच्या आकारातल्या या बेटाला सर्वात खास बनवतो तो म्हणजे इथला एकांत. श्रीमंत लोक येथे घर घेतात जेणेकरून त्यांना लागोस, नायजेरियातील सर्वात गजबजलेल्या शहरांपेक्षा ते यापासून वेगळं वाटेल. बेटावर सुरक्षा आणि गोपनीयता आहे. केवळ इन्व्हिटेशनच्या आधारेच या बेटावर प्रवेश करता येतो. त्यामुळे येथे रहदारी खूपच कमी आहे. बेटावरील दुकानं आणि शोरूम देखील खूप महाग आहेत, जी फक्त अब्जाधीशांनाच परवडतात.