मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवल! खास डासांसाठी चालवली जाते आहे ही स्पेशल Mosquito Terminator Train; पाहा VIDEO

ऐकावं ते नवल! खास डासांसाठी चालवली जाते आहे ही स्पेशल Mosquito Terminator Train; पाहा VIDEO

खास डासांसाठी ट्रेन.

खास डासांसाठी ट्रेन.

मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : रेल्वे, ट्रेन म्हटलं की त्यात प्रवासी आणि मालवाहतूक होते. सणासुदीचा काळ असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल तर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. पण कधी डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे. मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

डास म्हणजे आजार पसरवण्यास कारक ठरतात. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया असे गंभीर आणि जीवघेणे आजार होतात. त्यामुळे डास आपल्या आसपास असावेत असं कुणालाच वाटत नाही. किंबहुना डासांच्या नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उपाय केले जातात. असं असताना डासांसाठी स्पेशल ट्रेन का बरं? डासांना नेमकं या ट्रेनमधून कुठे नेलं जाणार? या डासांचं काय केलं जाणार? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.

हे वाचा - घरच्या घरीच तयार करा Mosquitoes Killer; एकही डास जिवंत राहणार नाही

पण डासांसाठी ट्रेन म्हणजे या ट्रेनमधून डासांची वाहतूक होणार नाही तर ही ट्रेन डासांचा खात्मा करणार आहे. पावसाळा म्हटला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका. घरात आपण डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉईल, क्रिम, लिक्विड याचा वापर करतो. प्रशासनामार्फत जागोजागी फवारणी केली जाते. पण दिल्लीत या डासांचा खात्मा करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवली जाते.

डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी ही ट्रेन चालवली जाते. या ट्रेनला डबे नाहीत. तर त्यावर हायप्रेशर ट्रक आहेत. ज्यातून मॉस्क्विटो औषध स्प्रे होतं. ही ट्रेन ताशी 20 किमी वेगाने धावते.

6 आठवडे एकूण 12 वेळा ही ट्रेन चालवली जाईल. दोनदा या ट्रेनमार्फत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. रेल्वे रूळ, त्याच्या आसपास डासांची पैदास होऊ नये, हे याचं उद्दिष्ट आहे.

हे वाचा - Mobile Apps मुळे खरंच डास पळून जातात? जाणून घ्या सत्य

अधिकाऱ्यांच्या मते, बऱ्याच ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अस्वच्छ पाणी जमा होतं आणि तिथं डासांची पैदास होते. यामुळे डासांच्या अळ्याच नव्हे तर डासांचाही नायनाट होईल. रेल्वे रूळांजवळ झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी हा दिलासा आहे.

First published:

Tags: Delhi, Health, Lifestyle, Train, Viral, Viral videos