मुंबई, 11 डिसेंबर : एक छोटासा डास किती खतरनाक ठरू शकतो हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असे कितीतरी आजार डासांमार्फत पसरतात. त्यामुळे घरात किंवा परिसरात डास झाले की त्यांना पळवण्यासाठी आपण कितीतरी उपाय करतो. डास आपल्या शरीरावर कुठे बसलेला दिसला रे दिसला की आपण त्याला मारतो. पण सध्या डासाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर जे डास आपल्याला चावतात त्यांचीच दया येईल. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल डास कधी येतात आणि आपल्याला चावून जातात ते समजतही नाही. पण या डासांनाही आपल्याला दंश करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे का? तेच या व्हिडीओमध्ये आहे. डास जसा आपल्या शरीरावर बसतो तसा तो रक्त शोषण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडीओतील डासही तेच करत आहे. पण तुम्ही पाहिलं तर हा डास एका व्यक्तीच्या हातावर बसला आहे. हाताच्या त्वचेतून डंक तो शरीरात घुसवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा डंक काही घुसत नाही. तो वारंवार वाकडा होतो. त्यानंतर जशी सुरीला धार काढावी तसे आपल्या दोन्ही हातांनी तो डंक घासतो आणि पुन्हा शरीरात घुसवण्याचा प्रयत्न करतो. वारंवार तो प्रयत्न करतो पण फेल होतो.या डासाला पाहून आपल्यालाही वाईट वाटतं. त्याची दया येते. हे वाचा - काय म्हणावं आता! गोरं करण्यासाठी म्हशीलाही फासली क्रीम; परिणाम तुम्हीच VIDEO मध्येच पाहा @TheFigen_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. डास कदाचित म्हातारं झालं, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. हे वाचा - Shocking! असा डास चावला की करावे लागले 30 ऑपरेशन, कोमात गेला तरुण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डासांना मानवी रक्त शोषून ऊर्जा मिळते, मानवी रक्तातील पोषक तत्त्वे मिळतात. यामुळेच ते वारंवार मानवी शरीराला चावतात आणि भरपूर रक्त शोषतात. डास त्याच्या वजनाच्या तिप्पट माणसाचे रक्त शोषतो.