मुंबई, 11 डिसेंबर : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर इतके अतरंगी असतात की आपण विचारही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका तरुणाने चक्क म्हशीला गोरं करण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हशीला एक क्रीम लावली आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की त्यालाही धक्का बसला. आपला रंग गोरा असावा असं अनेकांना वाटतं. आपल्याला जोडीदार गोरा मिळावा, आपलं मूल गोरंगोमटं असावं अशी इच्छा काही लोकांची असतेच. यासाठी कित्येक लोक काय काय उपाय करतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही कधी म्हशीला गोरं करण्याचा विचार केला आहे का? एका तरुणाला ही कल्पना सुचली. त्याने आपला हा विचार प्रत्यक्षातही आणला. त्याचा परिणाम काय झाला हे तुम्हीच व्हिडीओत पाहा. हे वाचा - VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात… व्हिडीओत पाहू शकता तरुण आपल्या हातात एक क्रीम घेऊन येतो आणि म्हशीजवळ जाऊन उभा राहतो. त्यानंतर क्रीम आपल्या हातावर घेऊन तो म्हशीच्या चेहऱ्यावर लावतो. म्हशीच्या चेहऱ्याच्या एका भागावर तो क्रीम फासतो. पण तुम्ही पाहिलं तर म्हशीचा रंग जरासाही बदलत नाही. त्यानंतर म्हशीसोबत असं काही विचित्र प्रयोग करून पाहिल्याने तरुणालाही लाज वाटते.
हा मजेशीर व्हिडीओ funtaap या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे, ती आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. हे वाचा - Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि… (सूचना - या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एखादी क्रीम रंग गोरा करेल किंवा रंगभेदाचं न्यूज 18 लोकमत समर्थन करत नाही. रंगावरून कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. याची नोंद घ्यावी)