बर्लिन, 27 नोव्हेंबर : डास चावल्याने आपल्याला बरेच आजार होतात. विशिष्ट प्रजातीचे हे डास असतात ज्यांच्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असे आजार होतात. या आजारांमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचीही वेळ येते. पण हा डास इतका खतरनाक ठरू शकतो की एखाद्याचे 30 ऑपरेशन करावे लागतील आणि तब्बल 4 आठवडे ते व्यक्ती कोमात जाईल, असा तर आपण स्वप्नातही विचार केला नसेल. पण असं जर्मनीतील एका तरुणासोबत घडलं आहे.
जर्मनीच्या रोडरमार्कमध्ये राहणारा 27 वर्षांचा सेबेशियन रॉट्सचक. 2021 साली त्याला डास चावला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार त्यानंतर त्याला इन्फेक्शन झालं. सुरुवातीला त्याच्यामध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू लागली. तो आजारी पडू लागला. काहीच खाऊपिऊ शकत नव्हता. अंथरूणातून उठणंही त्याला शक्य होत नव्हतं. त्यानंतर आता हळूहळू त्याच्या लिव्हर, किडनी, हार्ट आणि फुफ्फुसानेही काम करणं बंद केलं.
हे वाचा - अरे बापरे! हे काय? अशा अवयवासह जन्माला आली चिमुकली की पाहून डॉक्टरही शॉक
ही सर्व लक्षणं एशियन टाइगर डास चावल्याची आहेत हे डॉक्टरांना समजलं. डास चावल्यानंतर त्याच्या रक्तात विष पसरलं. त्याच्या पायाला सेराटिया नावाच्या बॅक्टेरिअलने हल्ला केला. त्याची निम्मी जांघ खाल्ली. त्याच्या जांघेवर त्वचा प्रत्यारोपणही करावं लागलं. पायाची दोन बोटं कापावी लागली. त्याचे एकूण 30 ऑपरेशन झाले. 4 आठवडे तो कोमात होता.
डास का चावतात?
डासांच्या 3500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त मादी डासांच्या काही प्रजाती माणसांना चावतात. मादी डासांना त्यांच्या अंड्यांसाठी प्रोटिनची गरज असते आणि त्यांना मानवी रक्तातून ते प्रोटिन मिळतात. यामुळेच त्वचेवर सुईप्रमाणे डंक मारून डास लोकांना चावतात.
डास चावल्यानंतर त्वचेवर खाज सुटणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात आणि इतर गंभीर इन्फेक्शन्स होतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया हे डासांमुळे पसरणारे आजार आहेत. काही आफ्रिकन देशांमध्ये डासांमुळे पिवळा ताप पसरतो.
डासांपासून असा करा बचाव
जास्त डास असलेल्या ठिकाणी जाऊ नका, संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, मॉस्किटो रेपेलंट क्रीम क्रीम किंवा तेल लावा, रात्री मच्छरदाणी वापरा, घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवा.
हे वाचा - सप्लिमेंटसह घेतलं प्राण्यांना दिलं जाणारं इंजेक्शन आणि...; सिक्स पॅक बनवण्याची घाई तरुणाला पडली भारी
आजाराची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांना भेटून योग्य सल्ला, उपचार घ्या. या काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही डासांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.