दिल्ली, 27 ऑक्टोबर : ‘जो मैं ऐसा जानती प्रीत करे दुख होय, नगर ढिंढोरा पीटती प्रीत न करियो कोय’ हा संदेश हसीन अख्तर खास आपल्या शैलीत लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याने ‘बेवफा चायवाला’ या नावानं एक चहाचा स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलवर हमखास चहा तर मिळतोच पण त्यासोबत ‘कोई किसी का नहीं, ये झूठे नातें हैं, नातों का क्या’ असा संदेश आणि त्याचे स्पष्टीकरण ही मिळतं. खरं तर हा संदेश अख्तर यांना एखाद्या उपदेशकाप्रमाणे नाही तर हलक्या-फुलक्या पद्धतीने द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या चहाच्या दुकानाचं नाव जरा हटके ठेवलं आहे. आजच्या नैराश्याच्या काळात हे नाव ऐकून आणि वाचून लोकांनी क्षणभर हसावं असं त्यांना वाटतं. मुरादाबादमधल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील हरथळा सोनकपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या अख्तर यांनी हरथळा येथे चहाचा स्टॉल सुरू केला आहे. चहा प्यायल्याबरोबर शरीरात ऊर्जा आणि ताजेपणाची हमी देणारे अख्तर 40 वर्षांचे आहेत. हा स्टॉल सुरू करण्यामागे लॉकडाउन कारण असल्याचं ते सांगतात. “तो नैराश्याचा काळ होता. अशा काळात लोकांनी क्षणभर तरी हसावं, या उद्देशानं मी स्टॉलचं नाव जरा हटके ठेवलं आणि लोकांना ते आवडलं”, असं ते आवर्जून सांगतात. हेही वाचा - बापरे! केसांसह तरुणही पेटला; Fire Hair Cut करताना भडकली आग; Shocking Video हा चहाचा स्टॉल कसा सुरू झाला? “मी एक टॅक्सी ड्रायव्हर होतो. लॉकडाउन काळात लोकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. मी टॅक्सी चालवणंदेखील बंद केलं होतं. त्यानंतर आपण काहीतरी हटके काम केलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. मग मी घरातच चहावर निरनिराळे प्रयोग सुरू केले. त्यानंतर मी लवंग, वेलची, केशर, तुळस आणि गुळवेलीचा काढा तयार केला आणि तो लोकांना फार आवडला. लॉकडाउननंतर मी हरथळा येथे स्वतःचा स्टॉल सुरू केला आणि त्याचं नाव बेवफा चायवाला ठेवलं”, असं अख्तर यांनी न्यूज 18 लोकलशी बोलताना सांगितलं.
कपल्ससाठी चहाचे दर वेगळे! बेवफा चायवाला स्टॉलमध्ये प्रेमात फसवणूक झालेल्यांसाठी चहाची किंमत दहा रुपये ठेवण्यात आली आहे तर प्रेमी युगुलांसाठी चहाची किंमत 15 रुपये आहे. प्रेमी युगुलांसाठी चहाची किंमत पाच रुपये जास्त ठेवण्यामागे एक कारण आहे. “यातून मला कोणी कोणाचा नाही, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नकोस असा संदेश द्यायचा असतो. माझ्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक कपलला मी हिच गोष्ट समजवत असतो”, असं अख्तर यांनी सांगितलं. एकूणच हा चहाचा स्टॉल शहरातील शौकिनांसाठी एक आवडता स्पॉट बनला आहे.