मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! केसांसह तरुणही पेटला; Fire Hair Cut करताना भडकली आग; Shocking Video

बापरे! केसांसह तरुणही पेटला; Fire Hair Cut करताना भडकली आग; Shocking Video

केस कापताना डोक्याला आग

केस कापताना डोक्याला आग

हेअरकटसाठी डोक्याला आग लावणं तरुणाला पडलं महागात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gujarat, India

अहमदाबाद, 27 ऑक्टोबर : केस कापण्याच्या बऱ्याच स्टाईल आहेत. किती तरी हेअरकट आले आहेत. असाच हटके हेअरकट करण्याच्या नादात एक तरुण आगीत पोळला आहे. केस कापताना त्याच्या डोक्याला आग लागली. नको तो हेअरकट तरुणाच्या अंगाशी आला तो इतका भाजला की त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. या भयंकर घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. वापीतील एका सलूनमध्ये एक मुलगा हेअर कट करायला गेला. केस कापताना त्याच्या डोक्याला आग लागली. अरिफ शाह असं या मुलाचं नाव आहे.

आयएएनएसशी बोलताना सहाय्यक उरनिरीक्षक मयुरीबेन यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार अरिफ बुधवारी बंटी संलूनमध्ये हेअरकटसाठी गेला. बार्बरला त्याने फायर हेअर कट करायला सांगितलं. जेव्हा त्याचे केस कापले जात होते तेव्हा त्याच्या मित्राने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला कारण अरिफ सोशल मीडियावर अॅक्टिवर होता आणि आपल्या फायर हेअर कटचा व्हिडीओ त्याला आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करायचा होता.

हे वाचा -  बापरे! कानातून शिट्टी वाजली, नंतर ऐकूच येईना; दिवाळी फटाक्यांमुळे तरुण झाला बहिरा

सामान्यपणे केस कापण्यासाठी कात्री वापरली जाते पण फायर हेअरकटमध्ये नावाप्रमाणेच  केस कापण्यासाठी आगीचा वापर केला जातो.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता खुर्चीत बसलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर टॉवेल ठेवला आहे, जेणेकरून आग त्याच्या तोंडावर जाऊ नये. केसांवर केमिकल स्प्रे केल्यानंतर बार्बर माचिसची काडी पेटवतो आणि केसांना लावतो. काही क्षणात संपूर्ण केस पेटतात. बार्बर आगीवर कपडा मारून आग विझवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याच्या नियंत्रणाबाहेर जाते. आग त्या मुलाच्या डोक्याच्या त्वचेपर्यंत पोहोचते. त्याला चटके लागतात तेव्हा तो पटकन खुर्चीवरून उठतो.

हे वाचा - लहान मुलाच्या हातावर आईने बनवला असा टॅटू, अखेर खावी लागतेय तुरुंगाची हवा

तरुणाचा फायर हेअरकट करताना आग भडकली आणि तरुणाचं डोकं पेटलं. फक्त डोकंच नव्हे तर त्याच्या शरीराचा इतर भागही भाजल्याचं सांगितलं जातं आहे. सुरुवातीला त्याला वापीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथून सुरतच्या सरकारी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

पीडित तरुणाचा आणि बार्बरसह सलूनमधील इतर लोकांचा जबाब घेतल्यानंतर पुढील तपास केला जाईल, असं पोलीस मयुरीबेन यांनी सांगितलं.

First published:

Tags: Gujrat, Viral, Viral video.