नवी दिल्ली 20 जानेवारी : सध्या जगातील अनेक देशांमध्ये इंटरनेटचं जाळं वेगानं पसरत आहे. यामुळे प्रत्येकजण डिजिटल जगाचा भाग बनत आहे. आपण आपल्या आजूबाजूला अशी मुलंही पाहतो, जी अवघ्या 2 ते 3 वर्षांची असूनही स्मार्टफोनवर गेम खेळताना आणि व्हिडिओ पाहताना दिसतात. मात्र आता समोर आलेला व्हिडिओ अतिशय वेगळा आहे.
Viral Video : 5 सिंह आणि एक म्हैस, कोण जिंकलं पाहा शिकारीचा थरार
सोशल मीडियावर काही माकडांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये माकड स्मार्टफोन वापरताना दिसत आहे. एकीकडे प्राण्यांच्या मानसिक क्षमतेचा विकास फार हळू होतो. अशात माकडांना स्मार्टफोन चालवताना पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Look at the success of digital literacy awareness reaching an unbelievable level! pic.twitter.com/VEpjxsOZa3
— Kiren Rijiju (@KirenRijiju) January 19, 2023
व्हिडिओ शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, देशात डिजिटलायझेशनचे काम वेगाने सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे, की जेव्हा प्राणी माणसांप्रमाणे मोबाईल वापरायला लागतात तेव्हा डिजिटल साक्षरता जनजागृती मोहीम यशस्वी झाली, असं मानलं जाऊ शकतं. व्हिडिओमध्ये काही माकडं स्मार्टफोनची स्क्रीन स्क्रोल करताना दिसत आहेत.
मेरी बाई नही आयी; चक्क माकडावर आलीये भांडी घासायची वेळ, पाहा Video
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर एक लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये एका यूजरने लिहिले की, 'This is really amazing.' दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं की डिजिटायझेशन प्राण्यांनांही आपल्या नियंत्रणाखाली आणत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Other animal