नैरोबी, 20 जानेवारी : चित्ता आणि माकड
(cheetah monkey video) यांची तुलना होणं शक्यच नाही. चित्ता माकड म्हणजे काहीच नाही, असंच आपल्याला वाटतं. साहजिकच दोघांचीही शक्ती पाहता ते योग्यच आहे. पण एका माकडाने मात्र याबाबतीत आपल्याला चुकीचं ठरवलं आहे. एकटं माकडा एक नव्हे, दोन नव्हे तर तर तब्बल तीन तीन चित्त्यांवर भारी पडलं आहे. तीन-तीन चित्त्यांची शिकार या एकट्या माकडाने पळवली आहे.
चित्ता आणि माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात चित्ता आणि माकडाचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल. चित्ता म्हणजे खतरनाक आणि माकड म्हणजे साधं पण या व्हिडीओत हेच उलटं झाल्याचं दिसतं आहे.
तीन चित्ते एका काळविटाच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहेत. एरवी शिकार हातात लागताच कोणताही हिंस्र प्राणी त्याच्यावर चांगलाच घाव घालतो. पण इथं मात्र तिन्ही चित्ते मात्र मांजर जशी उंदराला खेळवते तसं या काळविटाला खेळवताना दिसले. तिघंही त्याला आपल्या हातांनी घट्ट पकडून धरतात, कधी त्याला आपल्या जबड्यात धरतात. बऱ्याच वेळा काळविट त्यांच्या तावडीतून सुटून पळतानाही दिसतं. त्यानंतर तिघंही त्याला पकडतात. असं बराच वेळ सुरू असतं. अचानक एका माकडाची एंट्री होते आणि पूर्ण डाव पलटतो.
हे वाचा - बापरे! चक्क 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO
एक मोठं माकड तिथं धावत येतं आणि मग तिन्हीच्या तिन्ही चित्तेत आपली शिकार काळविटाला सोडून पळून जातात. त्याचवेळी माकड संधी साधतं. तिन्ही चित्ते आपल्या शिकाराला पाहत राहतात आणि माकड ती शिकार घेऊन पळून जातं. माकडाने शिकार नेताच तिन्ही चित्ते आपले लाळ गाळत पाहत राहतात. काहीच करत नाहीत.
या माकडाचं नशीब चांगलं म्हणून ते या चित्त्यांशी भिडून अगदी त्यांची शिकार त्यांच्या जबड्यातून खेचून आणूनही त्यांच्या तावडीतून सुटलं आहे. पण प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही. या माकडाने स्वतःला मृत्यू दारातच झोकून दिलं होतं पण मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे बाहेर पडलं.
हे वाचा - बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO पाहा; कान,डोळ्यावर विश्वास बसणार ना
केन्यातील मसाई माराच्या जंगलातील हा व्हिडीओ आहे. लौरा डायरने आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.