मुंबई, 21 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social media) तसे प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांनी शिकार करणं आपल्यासाठी नवं नाही. पण गेले काही दिवस एका घटनेने मात्र सर्वांनाच हादरवून टाकलं. माकड आणि कुत्र्यांमध्ये (Monkey vs dog) चक्क खुनी गँगवॉर रंगला. काही कुत्र्यांनी माकड्याच्या पिल्लाला जीवे (Monkey killed dog) मारल्यानंतर सुडाने पेटलेल्या माकडांनीही कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करायला सुरुवात केली (Monkey dog gangwar). कुत्र्यांना मारणाऱ्या या माकडांना पकडण्यातही आलं आहे (Monkey dog video). याचदरम्यान आता माकडाचा एक असा व्हिडीओ (Monkey video) व्हायरल होतो आहे, जो पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतील (Monkey saved cat video). माकड तसं खोडकर, त्रास देणारं असतं हे आपल्याल माहितीच आहे. पण गेले काही दिवस त्यांचं आक्रमक, हिंसक रूपही आपल्यासमोर आलं. माकडांनी हे सर्व केलं ते सुडाच्या भावनेतून. पण याच माकडांमध्ये माणुसकीही आहे, हेच या व्हिडीओतून दिसून आलं आहे. एका माकडाने चक्क एका मांजराचा जीव वाचवला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक मांजर हौदात पडतं. ते मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत असतं. तिथूनच एक माकड जात असतं. त्याच्या कानावर मांजराचा आवाज पडतो. मांजराचा आवाज ऐकून माकड त्याच्या दिशेने धावत येते. मांजराला हौदात पडलेलं पाहताच तो मागचा पुढचा कोणताच विचार न करता स्वतः त्या विहिरीत उडी मारतं. हौदात पाणी नाही पण चिखल असतो. हे वाचा - जबरदस्त! एका उडीतच मांजराने पार केली भलीमोठी नदी; VIDEO पाहून IAS अधिकारीही थक्क माकड मांजराला वाचवण्यासाठी आत जातं खरं पण आता वर कसं यायचा हाच प्रश्न त्याला पडतो. कारण हौदाचा कठडा उंच असतो. तो पुन्हा वर जातो. कठड्याला हातांनी धरतो आणि एक हात मांजराकडे करूतो पण उंची जास्त असल्याने असाही त्याचा हात मांजरापर्यंत पोहोचत नाही. मग तो पुन्हा खाली उडी मारतो. मांजराला आपल्या हातात धरून वर उडवण्याचा प्रयत्न करतो पण तेपण शक्य नाही हे त्याच्या लक्षात येतं. आपण एकटं काहीच करू शकत नाही हे त्याला समजतं त्यानंतर तो पुन्हा कठड्यावर येऊन बसतो आणि कुणी मदतीसाठी येतं का याची वाट पाहतो.
Be this monkey in our troubled world💕
— Susanta Nanda (@susantananda3) December 20, 2021
Credit in the video pic.twitter.com/hGsdDcicjd
इतक्यात त्याला एक लहान मुलगी दिसताच तो तिच्याकडे पाहत हौदाजवळ फिरू लागतो. त्यानंतर मुलगी माकडाचा इशारा ओळखते आणि ती आत डोकावून पाहते. आत मांजर दिसताच मुलगी त्या हौदात उतरते आणि ती त्या मांजराला आपल्या हातात घेऊन त्या माकडाच्या स्वाधीन करते. एखाद्या आईने आपल्या लेकराला कुशीत घ्यावं तसं ते माकड मांजराला कुशीत घेऊन बसतं. हे वाचा - चिप्स चोरण्यासाठी चक्क कुत्र्यानं केली माकडाची मदत; VIDEO पाहून व्हाल अचंबित आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या या जगात अशा माकडासारखं व्हा. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी माकडाचं कौतुक केलं आहे.

)







