Home /News /viral /

सोंडेत धरली गाडी आणि...; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला; पाहा VIDEO

सोंडेत धरली गाडी आणि...; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला; पाहा VIDEO

आपल्या हद्दीत माणसांना पाहून चवताळला हत्ती.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : हत्ती (Elephant video)  कितीही अवाढव्य असला तरी सहसा तो विना कारण माणसांवर हल्ला करत नाही. बहुतेक वेळा तो शांतच असतो. आपण बऱ्याच वेळा त्यांना आपल्या आसपासही कधी ना कधी पाहतो. त्यामुळे जंगल सफारीवर गेल्यावर इतर जंगली प्राण्यांना पाहून जितकी भीती वाटते. तितकी हत्तीला पाहून वाटत नाही. त्यामुळे बरेच पर्यटक समोरून हत्ती येताना दिसताच पळत नाहीत, तर त्याच्यासमोरच बिनधास्तपणे उभे राहतात (Angry elephant video) . अशाच पर्यटकांवर हत्तीने (Angry Elephant) भयंकर हल्ला केला आहे (Angry elephant attack on tourist). काही कारणांमुळे हत्ती पिसाळला तर मग त्याच्यासमोर असलेल्यांची खैर नाही. हत्ती चवताळण्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या हद्दीत घुसणं. जर हत्तींच्या परिसरात कुणी घुसलं, त्यांच्या आयुष्यात व्यत्यय आणला, त्यांना त्रास दिला तर हत्ती त्यांना सोडत नाही. अशाच हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल  (Viral video)होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता पर्यटकांची एक गाडी एका ठिकाणी थांबली आहे. समोरून हत्ती येताना त्यांना दिसले. पण तरी पर्यटक तिथेच राहिले. एक तरुण तर अगदी गाडीबाहेर त्यांच्यासमोर बिनधास्तपणे उभा राहिला. हत्ती आपल्याला काही करणार नाहीत असं त्यांना वाटलं. हे वाचा - छाती ताणून वाघासमोर फोटो काढायला उभा राहिला आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO सुरुवातीला हत्तीही त्यांच्या दिशेने धावत येतो आणि थोडा वेळ थांबतो. पण तरी पर्यटक हलत नाहीत म्हणून त्याला राग अनावर होतो आणि तो पर्यटकांनी भरलेल्या गाडीवरच हल्ला करतो. गाडी आपल्या सोंडेत धरतो आणि उलटी करतो. त्यानंतर मात्र गाडीतील पर्यटक धडाधड गाडीतून उड्या मारत बाहेर पडतात आणि जीव मुठीत धरून हत्तीपासून दूर पळतात. सुदैवाने हत्ती कुणाला हानी पोहोचवत नाही. गाडी उलटी केल्यानंतर तो तिथून गप्पपणे निघून जातानाही दिसतो. हे वाचा - जंगलाचा राजा सिंह आणि पर्यटकांमध्ये रंगला Tug of war; कधीच पाहिला नसेल असा VIDEO आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुम्ही त्यांच्या घरात घुसता आणि त्यांचा छळही करण्याचा प्रयत्न करता. नीट वागा, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या