मुंबई, 01 डिसेंबर : डॉल्फिन (Dolphin video) तर तुम्ही पाहिलीच असेल. कुणी प्रत्यक्षात तर कुणी व्हिडीओमध्ये डॉल्फिन पाहिली असावी (Dolphin jumping video). एरवी डॉल्फिन खेळताना (Dolphin playing video) तसंच समुद्रात उंच झेप घेत उडी मारताना दिसतात. पण तुम्ही डॉल्फिनला डान्स (Dolphin dancing video) करताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका डान्स करणाऱ्या (Dolphin dance with girl video) डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
डॉल्फिनला तरी त्याला बुद्धिमान प्राणीही समजलं जातं. कारण ते हुबेहुब माणसाला कॉपी करण्यात तरबेज असतात. माणसांची अशी नक्कल करणारी ही डॉल्फिन आहे. जिने अगदी माणसांप्रमाणे डान्स करून दाखवला आहे. व्हिडीओ पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल.
डॉल्फिन हा मासा असला एक स्तनधारी जलचर आहे. इतर माशांप्रमाणे डॉल्फिनही पाण्यात राहते. पण ती पाण्यात श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावं लागतं. त्यामुळे पाण्याबाहेरही डॉल्फिन जिवंत राहतात.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक डॉल्फीन पाण्याबाहेर जमिनीवर आहे. तिच्यासोबत एक तरुणी उभी आहे. डॉल्फिनसमोर बादली भरून मासे ठेवण्यात आले आहे. तरुणी त्यातले काही मासे डॉल्फिनला खायला देते त्यानंतर ती डॉल्फिनच्या शेजारी उभी राहून डान्स करू लागते.
हे वाचा - सोंडेत धरली गाडी आणि...; चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर खतरनाक हल्ला; पाहा VIDEO
तरुणी जशी गाण्यावर आपली कंबर हलवते. तसं डॉल्फिन तिच्याकडे पाहते आणि तीसुद्धा तरुणीप्रमाणे डान्स करू लागते. डॉल्फिनला कंबर नाही पण तरी ती आपलं शरीर अशा पद्धतीने हलवते जणू काही ती कंबरच हलवते आहे असं वाटतं. माणसांप्रमाणे डॉल्फिनही गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावता दिसते. असा व्हिडीओ तुम्ही कदाचित कधीच पाहिला नसावा.
हे वाचा - छाती ताणून वाघासमोर फोटो काढायला उभा राहिला आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
beautiffulgram नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला, कधीचा आहे याबाबत काही माहिती नाही. पण हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral, Viral videos