मुंबई : लग्नाशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असेल. हे व्हिडीओ कधी लग्नातील विधी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सध्या अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ वधू-वरांच्या जयमाला सोहळ्याशी संबंधित आहे. लग्नाशी संबंधित या व्हिडीओमध्ये वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वधू आणि वर त्यांच्या नातेवाईकांसह मंचावर दिसत आहेत. आता जयमाला घालायची पाळी. तेव्हा नववधू आधी नवरदेवाला हार घालते, त्यानंतर जेव्हा नवरदेव नववधूला हार घालण्यासाठी हात वर करतो, तेव्हा त्याचा पायजमा सुटतो आणि खाली येतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही सेकंदासाठी नवरदेवाला याची जाणीव होत नाही. पण नंतर जेव्हा नववधू हे पाहून आपली मान वळवते, तेव्हा नवरदेवाला हे लक्षात येतं आणि तो आपली मान वळवतो. वराला हे लक्षात येताच तो बाजूला जाऊन पँट घालतो. वराचं असं वागणं पाहून नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. लोकं तर हा व्हिडीओ मजे घेऊन पाहात आहेत.

)







