मराठी बातम्या /बातम्या /Viral /एका नागिणीसाठी घायाळ झाले 3 साप; जबरदस्त फायटिंगनंतर मादीने...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

एका नागिणीसाठी घायाळ झाले 3 साप; जबरदस्त फायटिंगनंतर मादीने...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

एका नागिणीसाठी तीन साप एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले.

एका नागिणीसाठी तीन साप एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले.

एका नागिणीसाठी तीन साप एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले.

कॅनबेरा, 01 ऑक्टोबर : एका तरुणीवर अनेक तरुणांचा जीव जडला आणि मग तिच्यासाठी त्यांच्यात फायटिंग झाली. माणसांमधील अशी प्रेम प्रकरणं आपल्यासाठी नवी नाहीत. पण अगदी प्राण्यांमध्येही मादीसाठी नरांमध्ये अशी फायटिंग होते (Male Snakes fıght for female snake). एका मादीसाठी आपसात भिडलेल्या अशाच सापांचा (Snake fighting video) व्हिडीओ (Snake video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका मादीसाठी चक्क तीन-तीन साप भिडले.

ऑस्ट्रेलियातील (Snakes In Australia) गोल्ड कोस्टमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घराच्या बाल्कनीत एकमेकांना वेटोळे घालून लढणाऱ्या सापांना पाहिलं. ती घाबरलीच आणि तिने स्नेक कॅचर्सचा (Snake Catchers)  फोन केला. आपल्या घराच्या बाल्कनी एक-दोन नव्हे तर बरेच साप आपसात लपटलेले असल्याचं तिने सांगितलं (Snakes Orgy In Womans Balcony).

महिलेच्या फोननंतर रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. तिथं बाल्कनीत चक्क चार साप होते. त्यातील तीन नर आणि एक मादी होती. एका मादीसाठी तीन नर साप आपसात भिडले होते (Snakes Fighting For Female). तिघंही लढाईत जखमी झाले होते. पण शेवटी मादी कोणाच्याच हाती लागली नाही. ती तिथून पसार झाली.

हे वाचा - आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाईल जीव

ज्या महिलेने या सापांची माहिती देण्यासाठी फोन केला होता, तिचं नाव सोफी कॉलेंड असं आहे. 7 news शी बोलताना तिने सांगितलं, आपल्या घराच्या बाल्कनीतइ इतक्या सापांना पाबून ती घाबरली. याआधी तिने एकत्र इतके साप कधीच पाहिले नव्हते. ते आपसात लढत होतं. मादीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

वाइल्ड एन्काऊंटर्स टीमने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. त्यांच्या मते, असं नेहमी पाहायला मिळत नाही. आपल्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये आपण असं कधीच पाहिलं नाही. एका मादासाठी अशी लढाई खूप कमी पाहायला मिळते.  वाइल्ड इन्काऊंटर्समधील सॅम होवार्ड यांनी सांगितलं साप बहुतेक अशाप्रकारे एकत्र राहत नाही. ते फक्त प्रजननासाठी असं करतात.

हे वाचा - OMG! शीर धडावेगळं झालं तरी टुणटुण उड्या मारतं; बेडकाचा आश्चर्यकारक VIDEO VIRAL

हे साप विषारी नव्हते. पण सापांना एकमेकांपासून वेगळं करण्यात खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांना एकमेकांपासून वेगळं करून घरातून हटवून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. एकाने घराच्या बाल्कनीतील हा रोमान्य खूपच भीतीदायक आहे, असं म्हटलं आहे. एका युझरने हे एका भयंकर स्वप्नासारखं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos