मुंबई 3 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. येथे लोकांना त्यांच्या आवडीचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट यांसारखे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच येथे प्राण्यांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खूप मजेदार असतात. तसे पाहाता पाळीव प्राणी हे फारच प्रेमळ आणि मायाळू असतात. त्यांना एकदा का आपण जीव लावला की, मग त्यांना देखील आपली सवय लागते. या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी, त्यांना आपली भाषा मात्र कळतेच. त्यामुळे तुम्ही त्यांना ही गोष्ट कर किंवा करु नको म्हटलं तर ते आपलं ऐकतात देखील. एवढंच काय तर प्राण्यांना आपलं चांगलं वाईट देखील कळत आणि त्यांची आपल्याप्रती असलेली भावना आणि कर्तव्य ते कधीही विसरत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये खरंतर एक लहान चिमुकली खिडकील पकडून उभं राहाण्याचं प्रयत्न करते, परंतू या चिमूकलीला तेथे जवळ असलेली मांजर असं करु देत नाही. ही मांजर त्या चिमुकलीचा हात बाजूला काढते. असं ही मांजर वारंवार करते. ज्यानंतर ही चिमुकली त्या मांजरीपासून लांब जाते आणि पुन्हा खिडकीला पकडण्याचा प्रयत्न करते. ज्यानंतर ही मांजर पुन्हा तेथे येते आणि त्या चिमुकलीचा हात बाजूला करते.
ग़ज़ब हैं ये बिल्ली मौसी 😄https://t.co/R6I792P7kD
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) October 3, 2022
ही मांजर काहीही केल्या, त्या चिमुकलीला त्या खिडकीला पकडूच देत नाही. खरंतर असं करण्यामागे त्या मांजरीचा हेतू चांगला असतो. कारण त्यांचं घर खूपच उंचावर असतं आणि त्या खिडकीला लटकताना चिमुकलीचा तोल देखील जाऊ शकतो, ज्यामुळे काळजीपोटी ती मांजर तसं करत आसावी. हे वाचा : रात्रीच्या अंधारात रस्त्यावर अजगर दिसताच व्यक्तीनं केली अशी गोष्ट, Video पाहून उडेल थरकाप हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच. लोकांना तो फारच आवडला आहे. लोकांनी वाघाची मावशी काळजी घेत आहे आणि आपलं कर्तव्य पार पाडत असल्याचं देखील म्हटलं आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.