मुंबई, 22 नोव्हेंबर : आता फक्त सेलिब्रिटी, सर्वसामान्य माणसंच नाही तर अगदी प्राणीही आपल्या फिटनेसबाबत (Fitness) जागरूक झाले आहेत असंच म्हणावं लागेल. याआधी मांजराच्या एक्सरसाइझचे व्हिडीओत (Excercise video) तुम्ही पाहिले असतील. आता एका फिटनेस फ्रिक माकडाचाही व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एक माकड चक्क हुला हुपिंग (Hula Hooping) करताना दिसलं (Monkey doing hula hooping video).
तुम्ही काही मुलींना कमरेभोवती रिंग फिरवताना पाहिलं असेल, यालाच हुला हुपिंग असं म्हटलं जातं, हा एक व्यायामाचा प्रकार आहे. हुला हूप करणाऱ्या या मुलींची कंबर एकदम लवचिक असते. हुला हूप हा कमरेचा घेर कमी करणारा एक उत्तम आणि मजेशीर असा व्यायाम आहे. तसा पाहायला खूप भारी वाटणारा हा व्यायाम सर्वांनाच जमतो असं नाही. पण या माकडाने मात्र अगदी माणसांपेक्षाही भारी हुला हुपिंग करून दाखवलं आहे.
View this post on Instagram
earthdixe नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक छोटंसं माकड एका ठिकाणी उभं आहे आणि ते कमरेभोवती गरागरा रिंग फिरवताना दिसतं आहे. इतक्या सहजपणे ते रिंग फिरवतं आहे की आपल्यालाही पाहून आश्चर्य वाटतं.
हे वाचा - शाळेचा गणवेश अन् पाठीवर बॅग घेऊन सायकल चालवताना दिसलं माकड; पाहा VIDEO
तुम्हालाही पोटाची ढेरी कमी करायची आहे, मात्र इतर व्यायाम करायचा कंटाळा आला आहे. तर हा मजेशीर व्यायाम तर तुम्ही नक्कीच करू शकता. हुआठवड्यातील काही दिवस 20 मिनिटांपर्यंत हुला हुप वापरणं तुमच्या फिटनेससाठी खूप फायदेशीर ठरेल. हुला हूप करण्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
पोटाचा घेर कमी होतो
तुम्हाला फक्त पोट आणि कमरेचा घेर कमी करायचा असेल, तर हुला हुप हा चांगला पर्याय आहे. हुला हुप कमरेभोवती फिरवत राहिल्यानं कमरेचे स्नायू कार्यरत राहतात. नियमित असं केल्यानं पोटाचा आणि कमरेचा घेर कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी होतं
वजन घटवायचं असेल, तर भरपूर प्रमाणात कॅलरीज घटवायला हव्यात. त्यासाठी अनेकदा तज्ज्ञ एरोबिक किंवा हृदयासाठी फायदेशीर असा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. हुला हुपमुळे तुमच्या अनावश्यक कॅलरीज कमी होण्यास मदत होते.
हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो
हुला हुप हा एकप्रकारे एरोबिक व्यायाम आहे, जो हृदयासाठी फायदेशीर ठरतो. हुला हुपिंग हायरपटेंशन किंवा उच्च रक्तदाब दूर ठेवण्यास मदत करतं, तसंच वाईट कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. उच्च रक्तदाब आणि कामी वाईट कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी हृदयाचे आजार बळावण्यास कारणीभूत ठरतात.
हे वाचा - हत्तीनं मॉडेलप्रमाणे मालकाकडून केस विंचरून घेतले; खास हेअरस्टाईल एकदा बघाच,VIDE0
शरीर स्थिती सुधारते
तुमची शरीर स्थिती चांगली असल्यास तुम्ही चांगले दिसता. तसंच शरीराची स्थिती योग्य नसल्यास सांधेदुखी बळावू शकते. मान, खांदा आणि पाठीत वेदना उद्भवू शकतात. हुला हुपमुळे तुमची बसण्याची आणि उभं राहण्याची स्थिती सुधारते.
मूड सुधारतो
हुला हुप हा एकप्रकारे मजेशीर व्यायाम आहे. एखाद्या म्युझिकसोबत तुम्ही हे खेळल्यास यातील मजा द्विगुणित होते. यामुळे तुमचा मूड सुधारतो. चिडचिड किंवा डिप्रेशन असल्यास हुला हुप वापराल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal