• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हत्तीनं एखाद्या मॉडेलप्रमाणे मालकाकडून केस विंचरून घेतले; खास हेअरस्टाईल एकदा बघाच, VIDEO

हत्तीनं एखाद्या मॉडेलप्रमाणे मालकाकडून केस विंचरून घेतले; खास हेअरस्टाईल एकदा बघाच, VIDEO

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीचे बॉब कट असलेले केस विंचरताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत हत्तीची अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल (Cute Video of Elephant) होत आहे तो अतिशय क्यूट आहे. हत्ती हा असा प्राणी आहे, ज्याला आपण त्रास दिला नाही तर तोदेखील आपल्यावर तितकंच प्रेम करतो. हत्ती शांत असण्यासोबतच अतिशय समजदारही असतात. सध्या अशाच एका हत्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीचे बॉब कट असलेले केस विंचरताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक हत्ती उभा आहे. त्याच्या डोक्यावर लांब केस दिसत आहेत. तिथे उपस्थित व्यक्ती हत्तीचे केस अतिशय प्रेमाने कंगव्याने विंचरत आहे. हत्तीदेखील अगदी शांतपणे उभा आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की हत्ती अतिशय आरामात उभा आहे. हत्तीच्या माथ्यावर लांब टिळाही लावलेला दिसतो. हा हत्ती इतका प्रेमळ आहे की जेव्हा समोरचा व्यक्ती त्याचे केस विंचरू लागतो तेव्हा हत्ती आपल्या गुडघ्यांवर बसतो, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये.
  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. आपण हा व्हिडिओ findingtemples नावाच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरत आहे. लोक इतर प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हायरल होणार हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून माझा दिवसच चांगला झाला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हँडसम बॉय. तर आणखी एकानं लिहिलं, खूपच प्रेमळ. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत हत्तीचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: