जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शाळेचा गणवेश अन् पाठीवर बॅग घेऊन सायकल चालवताना दिसलं माकड; पाहा VIDEO

शाळेचा गणवेश अन् पाठीवर बॅग घेऊन सायकल चालवताना दिसलं माकड; पाहा VIDEO

शाळेचा गणवेश अन् पाठीवर बॅग घेऊन सायकल चालवताना दिसलं माकड; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं की क्यूट माकड छोटी सायकल चालवत आहे (Monkey Cycling Video). या माकडाचे लहान मुलांप्रमाणे सुरू असलेले चाळे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू खुलेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही ना काही खास असतंच. त्यामुळेच लोक हा व्हिडिओ वारंवार पाहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ असेही असतात जे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Monkey) होत आहे. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. हे माकड सध्या चांगलंच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की क्यूट माकड छोटी सायकल चालवत आहे (Monkey Cycling Video). या माकडाचे लहान मुलांप्रमाणे सुरू असलेले चाळे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू खुलेल. या माकडाला पाहून लोक खळखळून हसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की माकडाने यूनिफॉर्म घातलेला आहे. यासोबतच त्याच्याकडे छोटीशी बॅगही आहे आणि हे माकडा अगदी आरामात सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ अतिशय खास आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओला 33 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. माकड माणसांप्रमाणेच एकदम परफेक्ट बॅलन्स साधून सायकल चालवत असल्याचं पाहून सगळेच थक्क झाले आहेत. माकडाने हिरव्या रंगाचा स्वेटशर्टप्रमाणे यूनिफॉर्म घातला आहे. गुलाबी रंगाची बॅग पाठीवर घेऊन हे माकड सायकल चालवत आहे.

जाहिरात

या व्हिडिओवर इन्स्टाग्रामवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला शाळेचे दिवस आठवले. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की ही व्हिडिओ क्लिप खरंच मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये. याआधीही माकड आणि एका लहान मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच माकड या चिमुकलीच्या हातातील फोन हिसकवताना दिसलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात