जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान माकडाची एन्ट्री; नवरदेवासोबत केलं असं काही की नवरीही शॉक, पाहा VIDEO

प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान माकडाची एन्ट्री; नवरदेवासोबत केलं असं काही की नवरीही शॉक, पाहा VIDEO

प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान माकडाची एन्ट्री; नवरदेवासोबत केलं असं काही की नवरीही शॉक, पाहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं लग्नाचं फोटोशूट करत असताना एक माकड पिल्लासह तिथे येतं. माकड आधी नवरीकडे जातं, त्यामुळे ती महिला घाबरते आणि तिथून निघून जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 डिसेंबर : आजकाल लग्नाआधी फोटोशूट करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे या जोडप्यांचे चांगले फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फोटोशूटही करतात. मात्र काहीवेळा फोटोशूट करण्यासाठी जंगली भागात गेल्यास तिथले प्राणीही या जोडप्याच्या त्रासाचं कारण बनतात. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याच्या लग्नाच्या फोटोशूटदरम्यान घडला, जेव्हा अचानक एक माकड तिथे आलं. यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून फक्त वधू-वरच नाही तर नेटकऱ्यांनाही धक्का बसला. उत्साहात नाचणाऱ्या नवरीसोबत विचित्र घडलं; कॅमेऱ्यासमोरच धाडकन कोसळली, Video Viral व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं लग्नाचं फोटोशूट करत असताना एक माकड पिल्लासह तिथे येतं. माकड आधी नवरीकडे जातं, त्यामुळे ती महिला घाबरते आणि तिथून निघून जाते. यानंतर माकड वराचा हात पकडून त्याच्या अंगावर चढतं. या दरम्यान माकड मोठ्या प्रेमाने वराला मिठीही मारतं. मजेशीर गोष्ट अशी आहे की वरही माकडाला हाकलण्याचा प्रयत्न करत नाही आणि हसत राहतो.

जाहिरात

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर she_saidyes नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘विश्वास बसत नाही की आमच्या व्हिडिओग्राफरना हे चित्रित करायला मिळालं. व्हाट अ वाइल्ड डे. . पण मला हा क्षण खूप आवडला. माकड आणि त्याचे पिल्लूही खूप गोंडस दिसत होतं.’ अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. वृत्त लिहिपर्यंत 3.5 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे, तर अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. अजब-भांडणाची गजब गोष्ट, नवऱ्यासोबत भांडून घराबाहेर पडलेली बायको, 30 लाख रुपये घेऊन परतली यूजर्स मजेशीर पद्धतीने यावर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं की, माकड नवरा शोधत होतं आणि तिला तुमचा नवरा आवडला. एका यूजरने लिहिलं की, ती आपल्या पतीला आपलं मूल दाखवण्यासाठी आली होती. दुसर्‍या युजरने लिहिलं आहे की, जणू माकड महिलेला सांगत आहे, चला निघा…आता फोटो काढण्याची माझी पाळी आहे. एकंदरीतच हा व्हिडिओ लोकांना खळखळून हसवत आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात