मुंबई 12 जून : केवळ जंगलातच नाही तर शहरांमध्येही माकडं काही ना काही मस्ती करताना दिसत असतात. कधी-कधी माणसंही त्यांच्या खोडसाळपणामुळे अस्वस्थ होतात. अनेक ठिकाणं तर अशी आहेत, जिथे माकडांची दहशत आहे. ते लोकांचं सामान तर घेतातच पण त्यांच्या हल्ल्यात अनेकदा लोक जखमीही होतात. मात्र आता माकडाचा एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले. यात माकड एका अतिशय धोकादायक जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा दिसत आहे, ज्यासोबत माकड पंगा घेताना दिसत आहे. हे खरं आहे. माकड कोब्राची शेपटी एक-दोनदा नाही तर अनेक वेळा ओढतं. माकडाचं हे कृत्य पाहून नागाला राग येतो आणि तो माकडाच्या पुढे फणा पसरवतो. तो माकडाला इशाराही देतो, पण खोडकर माकड कुठे ऐकणार. मात्र शेवटी हार मानेल तो किंग कोब्रा कसला. त्यानेही शेवटी माकडाला तिथून पळवून लावलं.
@Shnoyakam या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. माकड आपल्या मृत्यूला का आमंत्रण देत आहे हे लोकांना समजलं नाही. त्यामुळे लोक विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाख 37 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट्सही केल्या आहेत. काही लोकांनी तर कोब्रा विषारी असतात, हे माकडांना माहीत नाही का? असं विचारलं आहे. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही कोब्रा जंगलात कुठेतरी फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात एक माकड तिथे येतं आणि कोब्राला बसलेलं पाहून त्याच्या जवळ जातं. यानंतर तो कोब्राची शेपटी पकडतो आणि ओढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच अलर्ट मोडमध्ये बसलेला कोब्रा माकडाची सगळी मस्ती बाहेर काढतो. माकड वारंवार शेपटी ओढू लागताच कोब्रा माकडावर हल्ला करतो आणि माकड तिथून पळून जातं.