जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मंदिरात दिसलेला तो नंबर ठरला लकी; पुजाऱ्याने जिंकली 4 कोटीची लॉटरी, पैशातून केलं भलं काम

मंदिरात दिसलेला तो नंबर ठरला लकी; पुजाऱ्याने जिंकली 4 कोटीची लॉटरी, पैशातून केलं भलं काम

मंदिरात दिसलेला तो नंबर ठरला लकी; पुजाऱ्याने जिंकली 4 कोटीची लॉटरी, पैशातून केलं भलं काम

एके दिवशी पूजा करत असताना Wat Phra That Phanom Woramahawihan या मंदिराच्या सचिवाला एक बोर्ड दिसला ज्यावर 605 लिहिले होते. त्यांना हा देवाचा इशारा वाटला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 मार्च : तुम्ही 4 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे हे तुम्हाला कळालं तर? एक सामान्य व्यक्ती त्यानंतर एक आलिशान घर, कार आणि स्वतःसाठी आवश्यक असलेली सर्व काही खरेदी करेल. किंवा तो त्याचं कर्ज फेडेल. कदाचित काही लोक यानंतर रोड ट्रिपला जातात. मात्र लॉटरी लागल्यावर पैसे दान करणारे फार कमी लोक असतील. थायलंडमध्ये राहणाऱ्या एका बौद्ध भिक्खूने असंच काहीसं केलं (Monk Wins 4 Crore Rupees Lottery) .

तुमच्या आयुष्याचं रहस्य उलगडेल हा एक PHOTO; फक्त द्या एका प्रश्नाचं उत्तर

थायलंडमध्ये राहणारे फ्रा क्रू फानोम तिथल्या एका मंदिरात सचिव आहेत. एके दिवशी पूजा करत असताना Wat Phra That Phanom Woramahawihan या मंदिराच्या सचिवाला एक बोर्ड दिसला ज्यावर 605 लिहिले होते. त्यांना हा देवाचा इशारा वाटला. या क्रमांकाचं लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचं त्यांनी ठरवलं. यानंतर जे काही घडलं, ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं होतं

त्यानंतर फानोम आपल्या नातेवाईकांसोबत जेवायला गेले. तिथे त्यांनी काही लॉटरी तिकीटधारकांशी बोलून विशिष्ट क्रमांकाची तिकिटे हवी असल्याचं सांगितलं. मात्र अनेकांनी त्यास नकार दिला. मात्र त्यानंतर एक तिकीट विक्रेता स्वतः त्यांच्याकडे आला आणि तिकीट खरेदी करण्याची विनंती करू लागला. मात्र, त्यांना 605 ऐवजी 905 क्रमांकाचे तिकीट मिळाले.

गळ्यात 5 कोटीची साखळी, रक्षणासाठी बॉडीगार्ड! श्वानाची Lifestyle जाणून वाटेल हेवा

काही दिवसांनी त्यांना चार कोटींची लॉटरी लागल्याचं कळालं. पण या बौद्ध भिक्खूने हे पैसे समाजाच्या मदतीसाठी वापरण्याचं ठरवलं. त्यांनी हे सर्व पैसे दानधर्मासाठी दिले. याशिवाय प्रत्येक बौद्ध भिक्खूला अल्प रक्कमही वाटण्यात आली. मंदिरात काम करणाऱ्या मजुरांनाही त्यांनी काही रक्कम दिली. या घटनेनंतर लोक आता या बौद्ध भिक्खूचं कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात