मुंबई, 19 मार्च : मानवी मेंदू खूप गुंतागुंतीचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो आणि हाच दृष्टिकोन तुमचं व्यक्तिमत्वही सांगतो. आता तुमचं व्यक्तीमत्वं नेमकं कसं आहे, काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही एक छोटीशी टेस्ट द्या.
सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. आता असाच एक फोटो व्हायरल झाला आहे, जो तुमच्या आयुष्याचं रहस्य तुमच्यासमोर उलगडेल. सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युझन (Optical Illusion) फोटो व्हायरल होतो आहे. माइंड जर्नलने (Mind Journal) हा फोटो शेअर केला आहे.
हे वाचा - सांगा पाहू हे मांजर जिने चढतंय की उरतंय? उत्तरात दडलंय तुमच्या जीवनाचं मोठं सत्य
हा फोटो म्हणजे एक साधं स्केच आहे. जे फक्त रेषांनी तयार करण्यात आला आहे. रेषांनी याला मानवी आकार देण्यात आला आहे. यामध्ये माणसं दिसतं आहेत हे पक्कं आहे. कुणाला यात महिला दिसते आहे तर कुणाला पुरुष. तुम्हालाही या महिला आणि पुरुष दोन्ही दिसती. पण सर्वात आधी हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसलं त्या उत्तरात तुमच्या आयुष्याचं रहस्य उलगडेल.
जर स्केच पाहताच तुम्हाला यात सर्वात आधी महिलेचं शरीर दिसलं तर तुम्ही उदार आहात. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या सकारात्मकतेचं कौतुक करतात. तुमच्याकडे एक कुशल व्यक्ती म्हणून पाहिल जातं. तुम्ही प्रेरणआदायी व्यक्ती आहात आणि स्वतःचं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करता. एकंदरच तुम्ही संतुलित सामाजिक व्यक्ती आहात.
हे वाचा - बापरे! हे काय आहे? मुलांसाठी खरेदी केली Doll; घरी आणताच आईला फुटला घाम
जर तुम्हाला या फोटोत एका पुरुषाचा चेहरा दिसला तर तुम्ही असे व्यक्ती आहात ज्या स्वतःच्या भावना सहजासहजी जाहीर करत नाहीत. तुमच्या नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही ऊर्जाही जास्त आहे. तुम्ही तुमच्या वस्तू सहजपणे निवडत नाही आणि तुम्हाला सकारात्मक लोकांसोबत राहायला आवडतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.