Home /News /maharashtra /

Bhandara: भरलग्नात दोन मित्र आपसात भिडले; सपासप वार करत एकाची हत्या, धक्कादायक कारण समोर

Bhandara: भरलग्नात दोन मित्र आपसात भिडले; सपासप वार करत एकाची हत्या, धक्कादायक कारण समोर

Crime in Bhandara:भंडारा याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका लग्नात एका तरुणाने एकेकाळच्या आपल्या जीवलग मित्राची हत्या (young man killed friend) केली आहे.

    भंडारा, 13 डिसेंबर: महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका लग्नात एका तरुणाने एकेकाळच्या आपल्या जीवलग मित्राची हत्या (young man killed friend) केली आहे. एका लग्नात आरोपीनं मित्राला पाहिल्यानंतर जुना वाद (Old disputes) पुन्हा उफळला. यामुळे दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, एका तरुणानं आपल्या मित्राची चाकुने सपासप वार (Attack with knife) करत निर्घृण हत्या (Brutal murder at marriage venue) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत. मैदू पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर उमेश सोनकुसरे असं आरोपीचं नाव आहे. हत्येच्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी उमेशला ताब्यात घेतलं आहे. अन्य फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मृत मैदू आणि आरोपी उमेश हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. पण काही दिवसांपूर्वी कोणत्या तरी कारणातून त्यांच्यात वाद होऊन, मैत्रीचं रुपांतर दुष्मणीत झालं होतं. त्यामुळे दोन्ही गटात खुन्नस सुरू होती. हेही वाचा-आईनं डोळ्यादेखत सोडला प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी, हृदयद्रावक घटना दरम्यान, मैदू आणि उमेश हे आपापल्या मित्रांसोबत अन्य एका मित्राच्या लग्नात आले होते. मित्राच्या लग्नात दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर त्यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून निघाला. यामुळे ऐन विवाहस्थळीच दोन गटात तुफान राडा झाला. याच वादातून उमेश सोनकुसरे यानं मैदूवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की मैदू हा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा-Akola: टोळक्याने भररस्त्यात तरुणीचा 'बुरखा' उतरवत BFला बेदम मारलं, VIDEO व्हायरल हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मुख्य आरोपी उमेश सोनकुसरे याला ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder

    पुढील बातम्या