नवी दिल्ली, 15 एप्रिल : आपण बाहेर कुठे गेलो तर सर्वात मोठी समस्या असते ती मोबाईल चार्जिंग. घरातून मोबाईल फुल्ल चार्ज करून नेला तरी काही वेळाने मोबाईलची बॅटरी उतरते आणि फोन बंद होतो. यासाठी आता पोर्टेबल चार्जरही उपलब्ध आहे. गाडीतही चार्जिंगची सुविधा असते. पण तुम्ही कधी चपलेवर मोबाईल चार्ज झाल्याचं पाहिलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. गाडीने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या गाडीत मोबाईल चार्जिंगसाठी जबरदस्त जुगाड केला आहे. त्याने चक्क चपलेवर मोबाईल चार्ज केला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? चपलेवर मोबाईल कसा काय चार्ज होऊ शकतो. हा जुगाड आहे तरी काय? हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल. चला तर मग पाहुयात या व्यक्तीने चपलेवर मोबाईल चार्जिंगचा हा जुगाड केला तरी काय… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कारच्या डॅशबोर्डवर एक चप्पल दिसेत आहे. एक रबरी स्लिपर आहे. आता डॅशबोर्डवर स्लिपर कशासाठी तर ती मोबाईल चार्जिंगसाठी. Oh no! हे कसं झालं? मोबाईलमध्ये असं काय टाइप केलं की निघाला धूर; Shocking Video Viral एक व्यक्ती या चपलेवर आपला मोबाईल ठेवते आणि तो चार्ज करताना दिसते. एकंदर तुम्ही पाहिलं तर या चपलेचा वापर मोबाईल स्टॅंड म्हणून करण्यात आला आहे. गाडीत मोबाईल चार्जिंगसाठी स्टँड नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली तेव्हा या व्यक्तीने हा असा जुगाड केला. या चपलेच्या स्टँडवर मोबाईल अगदी सहज ठेवण्यात आला आहे आणि तो चार्ज होतो आहे. ielts.mehkma या इन्स्टाग्राम अकाऊंटवरहा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांना हा जुगाड आवडला आहे. Important News : सतत मोबाईल वापरत असाल तर सावधान व्हा, नाहीतर घडू शकते “ही” भयानक घटना! काही जणांनी तर बाजारात मिळणाऱ्या मोबाईल स्टँडपेक्षा हा स्टँड अधिक टिकाऊ आणि चांगला आहे, असं म्हटलं आहे.
तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.