हल्ली आपण बऱ्याच वस्तू, पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करतो. अगदी केकही ऑनलाईन मिळतात. एका तरुणीने असाच एक ऑनलाईन केक ऑर्डर केला होता. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
लिबर्टी कार्लसन असं या तरुणीचं नाव. तिने एक ऑनलाईन चॉकलेट केक ऑर्डर केला होता. 4 लेअर्सचा हा केक, ज्याची किंमत तब्बल 25 हजार रुपये होती. (महिलेने ऑर्डर केलेला केक)
पण ज्यादिवशी केकची डिलीव्हरी मिळाली, तेव्हा केक पाहून तिला धक्काच बसला. तिने सोशल मीडियावर ऑर्डर केलेल्या आणि डिलीव्हर झालेला अशा दोन्ही केकचे फोटोही शेअर केला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
केकऐवजी तिला एक स्पॉंज डिलीव्हर झाला होता. ज्यावर फक्त चॉकलेट पसरवलेलं होतं. काही स्प्रिंकल्सही होते. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
केक कुठेतरी पडला आणि तो उचलून तसाच डिलीव्हर करण्यात आला, असा वाटत होता. हा केक पाहून तो खाण्याचीही हिंमत झाली नाही. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
हा फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्सनीही हा केक पडल्याचं म्हटलं आहे आणि महिलेला रिफंड मागून घेण्याचा सल्ला दिला आहे. (महिलेला डिलीव्हर झालेला केक)