मुंबई, 16 एप्रिल: प्रसिद्ध होण्यासाठी किंवा पैशांसाठी लोक काय काय नाही करत. अगदी जीवघेण्या चॅलेंजनासुद्धा (danger challenge) सामोरे जातात. सध्या सोशल मीडियावर (social media) अशाच खतरनाक चॅलेंजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लोक लाखो रुपयांसाठी डेंजर चॅलेंज स्वीकारत आहेत. त्यापैकी एक म्हणजे विषारी सापांनी भरलेल्या टबमध्ये (sitting with snakes in tub) बसणे.
तुम्हाला तर फक्त वाचूनच फुटला ना? असं चॅलेंज कोण घेईल असंच तुम्हाला वाटेल. पण काही जणांनी चक्क हे चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवलं.
प्रसिद्ध youtuber मिस्टर बीस्टने हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने लोकांना विचित्र स्टंट करायला सांगितले आहे आणि ते पूर्ण केल्यास त्या बदल्यात पैसे मिळत आहेत.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच सापांचं चॅलेंज दिसेल. ज्यात टबमध्ये काही विषारी साप आहेत. या सापांसोबत एका विशिष्ट कालावधीसाठी टबमध्ये बसायचं आहे. जो अशी डेअरिंग करेल आणि स्टंट पूर्ण करेल त्याला 10 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास साडेसात लाख रुपये दिले जातील.
हे वाचा - सिंहाला पाहून पळत होता; जंगलाच्या राजाने झेप घेत मागून पंजात पकडलं आणि... VIDEO VIRAL
सुरुवातीला अनेकांनी हे चॅलेंज घेण्यास नकार दिला पण नंतर एका तरुणाने हिंमत केली आणि तो या सापांनी भरलेल्या टबमध्ये बसला. नंतर त्याच्या अंगावर वरून एक साप सोडण्यात आला. हा साप त्याच्या छातीवर ठेवण्यात आला. हळूच तो साप डुलत त्या तरुणाच्या कानाजवळ जातो. तेव्हा तर या तरुणाला चांगलीच भीती वाटते आणि पाहताच क्षणी आपल्या हृदयातही धडकी भरते. अंगावर अक्षरशः काटा येतो.
आता हा तरुण घाबरून उठेल असंच वाटतं. पण नाही. चेहर्यावर हसू आणत तो आपल्याच भीतीवर मात करताना दिसतो. अखेर तो चॅलेंज पूर्ण करतो आणि आपल्यासोबत साडेसात लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन जातो.
हे वाचा - Shocking! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनच हादराल
याच व्हिडिओत पुढे असे बरेच चॅलेंज आहेत. जे पाहून धडकीच भरते. पण तुम्ही स्वतःला डेअरिंग बाज समजत असाल तर असं काही तरी खतरनाक करण्याची तुमची तयारी आहे का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Shocking viral video, Snake, Snake video, Stunt video, Viral, Viral videos