जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनच हादराल

Shocking! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनच हादराल

Shocking! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे जे घडलं ते VIDEO पाहूनच हादराल

समुद्रातल्या बोटीला भल्यामोठ्या व्हेल माशाने (whale) जोरदार टक्कर दिली आणि बोटीतील एक व्यक्ती समुद्रात पडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल : समुद्रात मासे (Fish) पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही डॉल्फिन (Dolphin), व्हेल (Whale) असे कधीतरी पाहायला मिळणारे भलमोठे मासे दिसले मग तर काय विचारूच नका. काही समुद्रांमध्ये असे मोठ्या मोठ्या संख्येने असतात. तिथं लोक आवर्जून फक्त हे मासे पाहण्यासाठी जातात. दक्षिण आफ्रिकेतून (South africa) एक कुटुंबसुद्धा व्हेल मासे पाहण्यासाठी समुद्रावर गेलं आणि त्यांच्यातील एक सदस्य व्हेल माशाची शिकार होता होता बजावला (whale almost swallows man) आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral video) होतो आहे. दक्षिण आफ्रिकेतील अलगोवा समुद्रावरील _(Algoa Bay)_ही घटना आहे.  मारिनो घ्रेबावॅझ आपल्या मुलीसह व्हेल पाहायला गेले. बोटीत ते बसले होते. बोटीत त्यांच्यासोबत इतर प्रवासीसुद्धा होते. एक भलामोठा व्हेल मासा या बोटीजवळ आला आणि बोटीला आदळला.

जवळपास 40 टन वजनाचा हा मासा होता. इतक्या मोठ्या व्हेल माशाची बोटीला टक्कर लागताच बोट थोडी हलली आणि त्याचवेळी मारिनो पाण्यात पडला. त्याचवेळी व्हेल मासाही पाण्यात होता.  व्हिडीओत पाहू शकता व्हेल मासा उसळताना दिसतो आहे. मारिनो अगदी त्याच्या जबड्याच्या जवळच आहे. तो घाबरलेलासुद्धा दिसतो आणि  बोटीच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतो. त्याची मुलगी काय बोटीवरील सर्वजण घाबरले. हे वाचा -  VIDEO - ऑफिसमध्येच धू धू धुतलं; आंबटशौकिन बॉसला महिलेने घडवली चांगलीच अद्दल खरंच हा व्हिडीओ पाहून धडकीच भरते. मारिनो कसाबसा बोटीपर्यंत पोहोचतो. पण व्हेल मासा त्याला सोडेल का? आता काही याचा जीव वाचत नाही? व्हेल मासा याची शिकार करणार असंच तुम्हालाही वाटलं असेल. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर थोडं हायसं वाटतं. कारण मारिनो फक्त बोटीपर्यंत पोहोचत नाही तर बोटीत पुन्हा चढतोसुद्धा. हे वाचा -  याला म्हणतात LUCK! ऑनलाईन ऑर्डर केले Apple आणि डिलिव्हरीत मिळाला iPhone सुदैवाने तो व्हेल माशाच्या तावडीतून सुटला, त्याला काहीच झालं नाही. तो बोटीत येताच कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. ही घटना 3 एप्रिलची असल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात