जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'या' गावात जणू दुधाची वाहते नदी, पण कधीच होत नाही विक्री! असं का?

'या' गावात जणू दुधाची वाहते नदी, पण कधीच होत नाही विक्री! असं का?

दूध किंवा गायी-म्हशी विकायचा विचार जरी केला, तरी त्यांचं प्रचंड नुकसान होतं.

दूध किंवा गायी-म्हशी विकायचा विचार जरी केला, तरी त्यांचं प्रचंड नुकसान होतं.

या गावात येणाऱ्या पाहुण्यांना, गावाबाहेरील लोकांना किंवा गावाजवळ कामासाठी येणाऱ्या मजुरांना मोफत दूध, तूप, ताक, लोणी दिलं जातं.

  • -MIN READ Local18 Nuh,Mewat,Haryana
  • Last Updated :

कासिम खान, प्रतिनिधी नुह, 23 जून : ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’. ही म्हण केवळ शब्दांनुसार घेणं आता जवळपास अशक्य होत चाललं आहे. कारण दही, दूध, ताक, तूप लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. काही राज्यांमध्ये तर 70 ते 80 रुपये लिटर दराने दुधाची विक्री होते. मात्र अशातच तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की, हरियाणाच्या एका गावात केवळ दूधच नाही तर दुधापासून बनवले जाणारे सर्व पदार्थ मोफत मिळतात. होय, अगदी मोफत. हरियाणातील नुह जिल्ह्याजवळ असलेल्या छपेडा गावाची ही गोष्ट आहे. या गावात जवळपास 4 हजार लोक राहतात. शिवाय प्रत्यके घरात किमान 2 ते 3 गायी, म्हशी आहेत. त्यामुळे गावात कधीच दुधाची कमी भासत नाही. इथेअगदी दुधाची नदीच वाहते, असं म्हणायला हरकत नाही. मात्र असं असलं तरी येथील लोक कधीच दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थांची विक्री करत नाहीत. त्याउलट गावात येणाऱ्या पाहुण्यांना, गावाबाहेरील लोकांना किंवा गावाजवळ कामासाठी येणाऱ्या मजुरांना मोफत दूध, तूप, ताक, लोणी दिलं जातं. इथले लोक इतके उदार का आहेत जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

छपेडा गावावर नंदबाबांची कृपा आहे, असं येथील लोक म्हणतात. हे बाबा शेकडो वर्षांपूर्वी येथे वास्तव्यास होते. त्यांची समाधीदेखील गावात आहे. त्यांनी गावातील लोकांना कधीही दूध, दुग्धजन्य पदार्थ न विकणे, कधीही मद्यपान न विकणे अशा काही सवयींचं पालन करायला सांगितलं होतं. त्यामुळे गावकरी आजही या सवयी पाळतात. महत्त्वाचं म्हणजे कोणी दूध विकायचं किंवा गायी-म्हशी विकायचा विचार जरी केला, तरी त्यांचं प्रचंड नुकसान होतं. शिवाय पशूदेखील आजारी पडतात. त्यामुळे असं धाडस कोणीच करत नाही. VIDEO - तुम्हीही पिशवीतील दूध उकळून पिता? ही तुमची सर्वात मोठी चूक; माहिती नसेल असं सत्य दरम्यान, भरपूर प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ असल्याने येथील लोक प्रचंड तंदुरुस्त आहेत. शिवाय तुपामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर तेजही दिसतं. त्याचबरोबर या गावातील बाळंदेखील सुदृढ जन्माला येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात