मुंबई, 23 जून : दुधाची पिशवी घरी आणली की त्यातलं दूध आपण एका भांड्यात ओततो आणि ते उकळतो. दूध गरम करूनच आपण पितो. तुम्हीही असं पिशवीतील दूध पित असाल आणि ते उकळून घेत असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. पॅकेटमधील दुधाबाबत तुम्हाला माहिती नसेल असं सत्य. खरंतर दुधाच्या पिशवीवरच याची माहिती देण्यात आली आहे, पण तरी आपण सर्वजण ती चूक करतो. याचं कारण सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पूर्वी दूध एका भांड्यात थेट गायी-म्हशींपासून काढून आणलं जायचं. पण आता याची जागा पॅकेट दुधाने घेतली आहे. त्यामुळे आता बहुतेकांच्या घरात पाकिटातील दूधच येतं. त्यामुळे या दुधाबाबत ही गोष्ट तुम्हाला माहिती असायलाच हवी. सर्वात महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे.
गाय-म्हशींपासून काढलेलं दूध कच्चं असतं. ज्यात काही बॅक्टेरिया असतात. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी म्हणून दूध उकळलं जातं. Kitchen Jugaad Video - दूध गरम करताना त्यात साबण जरूर टाका; आहे जबरदस्त फायदा पण याची जागा आता पाकिट दुधाने घेतली तरी आपली दूध उकळण्याची सवय गेली नाही. पाकिटातील दूधही आपण उकळून पितो. पण खरंतर पाकिटातील दूध उकळण्याची गरज नाही. पाकिटातील दूध उकळलं तर त्याचा काहीच फायदा नाही. कारण त्यातील पौष्टीक तत्व नष्ट होतात. खरंतर दुधाच्या पाकिटावरच त्याचं इतकं मोठं सत्य लिहिलेलं असतं. ज्याची माहिती कुणाला नाही. आता हे पाकिटावर कुठे लिहिलेलं असतं, असा प्रश्न तुम्हाला पडेल. दुधाचं पाकिट आणलं तर ते नीट पाहा त्यावर पाश्चराइज्ड असा शब्द लिहिलेला असतो. म्हणजे त्यात असलेले सर्व बॅक्टेरिया आधीच मारले गेले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही दूध उकळता तेव्हा त्यातील पोषक घटक नष्ट होतात. असं दूध पिऊन काहीच फायदा नाही. दुध फ्रीजमध्ये ठेवलं तरी होतं का खराब? मग त्यामागे असू शकतं हे कारण @wise_weekly_1230 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्हाला याबाबत माहिती होती का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.