एका हातात मुलाला पकडून ट्रकवर चढतोय मजूर, व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्टी

एका हातात मुलाला पकडून ट्रकवर चढतोय मजूर, व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्टी

ट्रकच्या दोरीला एका हाताने धरून दुसऱ्या हातात चिमुकल्याला घेऊन लोंबकळणाऱ्या बापाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : लॉकडाऊनच्या काळात हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं असललेल्या ट्रकमध्ये चढतात. यावेळी एक व्यक्ती चिमुकल्याला एका हाताने उचलतो आणि आईकडे दोते. छत्तीसगढमधील या फोटोमुळे लोक घरी जात असताना किती त्रास सहन करतात. वेळ प्रसंगी त्यांनी कशी कसरत करावी लागते हे दिसत आहे.

फोटोमध्ये लहान मुलांसह ट्रकमध्ये व्यक्ती चढताना दिसते. यात लहान मुलाला व्यक्तीनं एका हातानं पकडलं आहे  तर दुसऱ्या हाताने ट्रकला असलेली दोरी धरली आहे. त्यानंतर ती व्यक्ती मुलाला ट्रकमध्ये असलेल्या व्यक्तीकडे सोपवते.

छत्तीसगढमधला हा व्हिडिओ असून यात एक महिलाही ट्रकमध्ये चढण्यासाठी धडपड करताना दिसते. एनडीटीव्हीशी बोलताना काही मजुरांनी सांगितलं की, 'तेलंगणातून प्रवास सुरू केला होता. घरी पोहोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. हाताला काम नाही आणि खायला पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही काय केलं असतं? ..आम्हाला घरी जायचं आहे.'

केंद्राकडून या महिन्यापासून विशेष रेल्वेसेवाही सुरु करण्यात आली आहे. त्याबद्दल विचारलं असता मजुरांनी सांगितलं की, आम्हाला अशी कोणती माहिती मिळाली नाही ज्यामुळे प्रवासासाठी मदत होऊ शकेल.

पाहा VIDEO : 'आम्ही ड्युटी करतो तिथंच थुंकताय?' पोलिसाने त्याला रस्ता धुवायला लावला

दरम्यान राज्य परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवासाचं इतर कोणतंही साधन नाही. प्रशासन त्यांना खास बसची सुविधा द्यायला तयार आहे. पण मी परिवहन विभागातून आहे आणि माझ्या पातळीवर कोणतीच व्यवस्था करू शकत नाही.

वाचा : लांबलचक साप शिरला ATM मशिनमध्ये, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

First published: May 12, 2020, 5:52 PM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading