गाझियाबाद, 12 मे : हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील आणि तुम्हाला भीतीही वाटेल. कारण चक्क एक लांबलचक साप पूर्णपणे एटीएममध्ये शिरला आहे. तो केवळ एटीएम रुममध्ये वावरला नाही आहे, तर एटीएम मशिनच्या आतमध्ये शिरला आहे. अगदी त्याचं शेपूटही बाहेर राहिलं नाही. गाझियाबादमधील एका आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. जागरणने दिलेल्या वृत्तानुसार काही वेळाने या सापाची त्या एटीएमधून सुटका करण्यात आली आहे. मात्र लोकांमध्ये भीती मात्र नक्कीच बसली आहे. जिल्हा वनअधिकारी दिक्षा भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप बिनविषारी होता. पण त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून कुणीही घाबरेल. ज्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्याने म्हटले आहे की, हा व्हिडीओ पाहून मला ‘नागीन’ चित्रपटाची आठवण झाली.
आणखी एका युजरने घडलेल्या प्रसंगाचा पूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने चक्क इशाराच दिला आहे की, एटीएममध्ये जाताना सावधान कारण आजुबाजूला साप असू शकतो.
Be careful when you are at the ATM!
— Amit Bhawani 🇮🇳 (@amitbhawani) May 9, 2020
There could be a Snake around 😱
PS: Initially felt that this could be normal but the last few seconds gave me chills. #WhatsappFwd pic.twitter.com/o40Erm9Chx
हे दोन्ही व्हिडीओ ट्विटरवर हजारो वेळा पाहिले गेले आहेत. अनेकांनी यावर हास्यास्पद कमेंट्स केल्या आहेत. पण ज्यांनी हा प्रसंग समोरून पाहिला त्यांची अवस्था काय झाली असेल, याचं वर्णन करणच कठीण आहे. जरी साप बिनविषारी होता, तरी या व्हिडीओतील शेवटचे काही सेकंद अंगावर काटा आणणारे आहेत.