मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शची झाली टक्कर, नुकसान ऐकून येईल चक्कर; पाहा हे PHOTOS

मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शची झाली टक्कर, नुकसान ऐकून येईल चक्कर; पाहा हे PHOTOS

भयंकर अपघातात एकमेकांवर आदळल्यानंतर झालं इतक्या कोटींच नुकसान, विश्वास बसत नसेल तर पाहा PHOTO

  • Share this:

झ्युरिक, 18 ऑगस्ट : स्वित्झर्लंडमध्ये एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 30 कोटींचे नुकसान झाले आहे. स्वित्झर्लंडमध्ये एक मर्सिडीज-बेंझ सी-क्लास वॅगन(Mercedes-Benz C-Class wagon), पोर्श 911 कॅब्रिओलेट (Porsche 911 Cabriolet) आणि बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) यांच्यात जबदरस्त धडक झाली. यामुळे तब्बल 4 मिलियन डॉलर म्हणजे 29.9 कोटींचे नुकसान झाले आहे. कांटो उरी पोलिसांनी बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्विस आल्प्समधील येथील गोथर्ड पासजवळ हा भयंकर अपघात घडला. याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार मर्सिडीज-बेंझला ओव्हर टेक करण्याच्या नादात तिन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. बुगाटी आणि पोर्श यांनी ओव्हरटेकचा प्रयत्न केला. यात एकमेकांवर या गाड्या आदळल्या. त्यानंतर, बुगाटीनं मर्सिडीज टक्कर दिली. तर, पोर्श मोटर होमवर आदळली.

वाचा-...आणि अचानक आकाशात दिसलं 'फायर टॉर्नेडो', पाहा दुर्मिळ VIDEO

वाचा-ज्या टॅंकवर चीनला होता सर्वात जास्त विश्वास, तोच अवघ्या 30 सेकंदात बुडाला

उरी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघातात एकूण 30 कोटींचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, " गोथार्ड पासकडे जाणारा रस्ता बचाव व बचाव कार्यासाठी तात्पुरता बंद करावा लागला होता.

वाचा-Ferari Ki Sawari पडली महागात! पोलिसांसमोर करायला गेला स्टंट, पोहचला थेट तुरुंगात

अनेक खासगी सेवा, नॅशनल रोड ऑफिस, उरी अॅवम्ब्युलन्स सर्व्हिस आणि उरी कॅन्टोनल पोलिस कार्यरत आहेत. कार बझच्या म्हणण्यानुसार, अपघातात पोर्शचे सर्वात मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या