मुंबई, 16 ऑक्टोबर : कुत्रा, मांजर अशा प्राण्यांच्या संपर्कात माणसं कायम येत असतात (Human animal video). त्यामुळे या प्राण्याचं आणि माणसांचं बाँडिंग खूप चांगलं असतं. एकमेकांसाठी ते आपला जीवही धोक्यात टाकतात (Human saved animal video). पण एरवी कधीही संपर्कात न येणाऱ्या प्राण्यांसाठी माणसं जेव्हा धावून जातात (Animal rescue video) तेव्हा असे प्राणीही माणसांचे उपकार कधीच विसरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका कांगारूने चक्क माणसांचे आभार मानले आहेत (Kanagroo video). एरवी कोणताही प्राणी संकटात असेल आणि माणसाने त्यांची सुटका केली ते तिथून धूम ठोकतात (Men saved kangaroo life video). साहजिकच ते प्राणी थोडे घाबरलेली असतात. त्यामुळे आपला जीव मुठीत धरून ते तिथून पळ काढतात. पण काही प्राणी याला अपवाद असतात. ते तिथं राहून आपला जीव वाचणाऱ्यांचे आभार मानताना दिसतात. असाच हा कांगारून आहे. ज्याला काही तरुणांनी हाडं गोठवणाऱ्या थंडगार पाण्यातून बाहेर काढलं, त्यानंतर कांगारूने आभारही व्यक्त केले (Kangaroo express gratitude video).
Two humans instantly jump on seeing a kangaroo struck in the ice cold waters of the lake, bringing it to to safety...
— Susanta Nanda (@susantananda3) October 14, 2021
Just look at the gratitude of the animal after that 💕
🎬In the video pic.twitter.com/dQ17ouA9Rl
व्हिडीओत पाहू शकता पाण्यात कांगारून थऱथरत उभं असलेलं दिसतं आहे. दोन तरुण त्या कांगारूला वाचवण्यात पाण्यात उडी घेतात. ते कांगारूच्या जवळ जातात. कांगारू घाबरलेलं आहे. सुरुवातीला त्याला ही माणसं आपल्याला धोका पोहोचवायला आली आहेत असंच वाटतं. पण दोन तरुणांपैकी एक तरुण कांगारूच्या पाठीवर हात ठेवून त्याला विश्वास देतं की ते लोक त्याला वाचवायला आले आहेत. तर दुसरा तरुण कांगारूचे हात म्हणजे पुढील दोन पाय धरतो. कांगारू सुरुवातीला थोडा विरोध करतानाही दिसतो. पण नंतर दोन्ही व्यक्ती त्याला पाण्यातून वर उचलतात तेव्हा कांगारू थोडा शांत होतो. हे वाचा - OMG काय ती डेअरिंग! चित्त्यालाच किस करायला गेली आणि…; पुढे काय घडलं पाहा VIDEO पाण्याच्या बाहेर एक व्यक्ती उभी आहे, त्या व्यक्तीकडे या कांगारूला सोपवलं जातं. कांगारू घाबरलेलं असल्याने ही व्यक्ती त्या कांगारूला शांत करतं, त्याची भीती दूर करतं. त्यानंतर कांगारून आपल्याला वाचवणाऱ्या व्यक्तींकडे पाहत राहतं. ते आवाज काढत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. जशा या दोन्ही व्यक्ती पाण्यातून बाहेर त्याच्याजवळ येतात. तेव्हा कांगारू चक्क त्यांचे आभार मानतो. एका व्यक्तीचा हात तो आपल्या दोन्ही हातात धरतो आणि त्यावर आपल्या तोंडाने जणू चुंबन घेतो आणि आपला जीव वाचवणाऱ्यांचे धन्यवाद मानतो. किती तरी वेळ तो त्या व्यक्तीचा हात असाच हातात घेऊन उभा दिसतो. हे वाचा - बापरे! आकाशातून कोसळला महाकाय साप, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ; पाहा VIDEO आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओतील माहितीनुसार हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाचा असल्याचं दिसतं आहे.

)







