• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बापरे! आकाशातून कोसळला महाकाय साप; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ; VIDEO VIRAL

अरे बापरे! आकाशातून कोसळला महाकाय साप; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ; VIDEO VIRAL

अचानक आकाशातून रस्त्यावर साप आला आणि नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

 • Share this:
  मुंबई, 15 ऑक्टोबर : कुठे जंगलात किंवा भरपूर झाडंझुडुपं असलेल्या भागात आपण फिरायला गेलो की इथं कुठे साप (Snake video) तर नाही ना, अशी भीती आपल्या मनात कायम असते. पण विचार करा हा साप कोणत्या जंगलात नाही तर तुम्ही नेहमी फिरत असलेल्या रस्त्यावर आढळला तर किंबहुना तो आधी रस्त्यावर समोर न दिसता थेट आकाशातून जमिनीवर कोसळला तर... (Snake fly from sky video)  विचार करूनच घाम फुटला ना. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे (Snake viral video). एका महाकाय सापाचा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होतो आहे. थेट आकाशातूनच हा साप जमिनीवर कोसळला. नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर पळापळ सुरू झाली. आरडाओरडा करत नागरिक पळू लागले. व्हिडीओ पाहूच तुम्हालाही धडकी भरले. व्हिडीओत पाहू शकता, रस्त्याच्या वर एक वायर आहे, या वायरला एक अवाढव्य साप लटकला आहे. वायरला तो विळखा घालून बसला आहे. खाली नागरिकांचा आरडाओरडा सुरू आहे. हळूहळू साप आपला विळखा सोडतो आणि धाडकन जमिनीवर कोसळतो. सापाला पकडण्यासाठी बचाव पथक तिथं आधीपासूनच असल्याचं दिसतं आहे. साप रस्त्यावर पडताच त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. हे वाचा - OMG काय ती डेअरिंग! चित्त्यालाच किस करायला गेली आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे माहिती नाही. पण व्हायरल हॉग ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: